खामगाव बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेची जिल्हा उप निबंधकांकडून चौकशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 01:57 PM2020-02-11T13:57:57+5:302020-02-11T13:58:06+5:30

कृउबासच्या सर्वसाधारण सभेच्या चौकशीमुळे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

District Deputy Registrar inquiries of Khamgaon Market Committee General Meeting! | खामगाव बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेची जिल्हा उप निबंधकांकडून चौकशी!

खामगाव बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेची जिल्हा उप निबंधकांकडून चौकशी!

Next

खामगाव: कृषी उत्पन्न बाजार समितीत ३ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेच्या चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधक सोमवारी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत धडकले. त्यांनी विरोधी सदस्यांसोबतच सभापतींच्या गटाचीही बाजू जाणून घेतली. कृउबासच्या सर्वसाधारण सभेच्या चौकशीमुळे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ३ फेब्रुवारी रोजी पार पडलेली सर्वसाधारण सभा ही नियमबाह्य होती. या सभेतील विषय सुचीवर महाराष्ट्र शेतीच्या उत्पन्नाची खरेदी-विक्री (नियमन व विकसन) १९६७ चे नियम १०८ (२) नुसार सह्यांचे अधिकार प्रदानकरणेबाबत हा विषय होता. या विषयाच्या बाजूने मतदानाची उपसभापती निलेश दीपके, संचालक श्रीकृष्ण टिकार, संजय झुनझुनवाला, विवेक मोहता, राजेश हेलोडे यांनी मागणी केली. त्यावेळी सभापती सभेतून निघून गेले होते. सभानियमांचा भंग केल्याप्रकरणी सभापती व सचिव यांची तातडीने सक्षम अधिकारीमार्फत समयबध्द कालावधीमध्ये चौकशी व्हावी अशी मागणी बाजार समितीचे उपसभापती निलेश दीपके, संचालक श्रीकृष्ण टिकार, संजय झुनझुनवाला, विवेक मोहता, राजेश हेलोडे यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांच्याकडे केली होती.


जिल्हा उपनिबंधकांचे कानावर हात!

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्वसाधारण सभेच्या चौकशीसंदर्भात जिल्हा उपनिबंधक महेश चव्हाण यांनी यासंदर्भात माहिती देण्याचे टाळले. चौकशी ही आपल्या नियमित कामकाजाचा एक भाग असल्याचे सांगत याप्रकरणी काहीही ऐकूण घेण्यास नकार दिला. कृउबासमधील चौकशी प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांची भूमिका एकप्रकारे कानावर हात ठेवल्यासारखी असल्याचीच चर्चा कृउबास वर्तुळात होती.
कृषी उत्पन्न बाजार समितीत ५ विरूध्द ४ असे संख्याबळ आहे. संख्याबळ आमच्या बाजूने असल्याने सभापतींनी बहुमत नसताना ठराव लिहीणे गैरकायदेशीर आहे. सभापतींच्या गैरप्रकाराची चौकशी सुरू असल्याने त्यांच्याकडील सभेचे कामकाज काढण्याची आपली मागणी आहे.
- श्रीकृष्ण टिकार
संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, खामगाव.


कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज नियमानुसार करण्यात आले. सभेतील ठरावाच्या चौकशीच्या अनुषंगाने सोमवारी जिल्हा उपनिबंधक कृषी उत्पन्न बाजार समितीत आले. त्यांनी आमची आणि विरोधी सदस्यांची बाजू ऐकूण घेतली.
- संतोष टाले
सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, खामगाव.

Web Title: District Deputy Registrar inquiries of Khamgaon Market Committee General Meeting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.