जिल्ह्यात ७१ जणांची कोरोनावर मात, १३ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:23 IST2021-07-09T04:23:09+5:302021-07-09T04:23:09+5:30

पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा दोन, खामगाव एक, देऊळगाव राजा एक, चिखली तीन, मलकापूर एक, नांदुरा एक, जळगाव जामोद तीन ...

In the district, 71 people defeated Corona, 13 positive | जिल्ह्यात ७१ जणांची कोरोनावर मात, १३ जण पॉझिटिव्ह

जिल्ह्यात ७१ जणांची कोरोनावर मात, १३ जण पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा दोन, खामगाव एक, देऊळगाव राजा एक, चिखली तीन, मलकापूर एक, नांदुरा एक, जळगाव जामोद तीन आणि सिंदखेड राजा तालुक्यातील एकाचा यामध्ये समावेश आहे. दुसरीकडे शेगाव, मेहकर, लोणार, मोताळा आणि संग्रामपूर तालुक्यातील तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एकही जण बाधित आढळून आला नाही. दरम्यान, ७१ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

सोबतच आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ५ लाख ९४ हजार ९० संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. तसेच एकूण बाधितांपैकी ८६ हजार २६९ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून आतापर्यंत सुटी मिळालेली आहे.

--१६८८ अहवालांची प्रतीक्षा--

तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी १ हजार ६८८ जणांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ८७ हजार ५१ झाली आहे. त्यापैकी ११८ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहे. आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे ६६४ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.

Web Title: In the district, 71 people defeated Corona, 13 positive