विशेष घटक योजनेअंतर्गत दुधाळ जनावरांचे हाेणार वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:32 IST2021-02-05T08:32:50+5:302021-02-05T08:32:50+5:30

२८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत बुलडाणा : जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जाती (एस. सी.) प्रवर्गातील लाभार्थ्यांना विशेष घटक ...

Distribution of milch animals under special component scheme | विशेष घटक योजनेअंतर्गत दुधाळ जनावरांचे हाेणार वाटप

विशेष घटक योजनेअंतर्गत दुधाळ जनावरांचे हाेणार वाटप

२८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत

बुलडाणा : जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जाती (एस. सी.) प्रवर्गातील लाभार्थ्यांना विशेष घटक योजनेनुसार ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे व शेळीगट वाटप करावयाचे आहेत. या योजनेचा लाभ देण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पंचायत समितीच्या स्तरावर पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू झालेली आहे. अर्ज १ फेब्रुवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात स्वीकारण्यात येणार आहेत. अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध आहे.

दुधाळ जनावरे / शेळी गटासाठी एका कुटुंबातील केवळ एकाच लाभार्थ्याने अर्ज करावा. अर्जदार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील व दारिद्र्यरेषेखालील असावा, अर्जदाराने किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याने सदर योजनेचा याआधी लाभ घेतलेला नसावा, ही योजना ७५ टक्के शासकीय अनुदान व २५ टक्के बँकेचे अर्थसाहाय्य अशा स्वरूपाची असल्यामुळे अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा, अर्जदारास १ मे २०११ नंतर तिसरे अपत्य नसावे, याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला अर्जासोबत जोडावा लागणार आहे. या योजनेचा लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्धशाळा विषय समिती सभापती राजेंद्र पळसकर व पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ठाकरे यांनी केले आहे.

Web Title: Distribution of milch animals under special component scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.