आश्रुबाबा महाराज यात्रेनिमित्त महाप्रसादाचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:32 IST2021-02-14T04:32:39+5:302021-02-14T04:32:39+5:30

दरवर्षी जाफ्राबाद येथे आश्रुबाबा महाराज यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यात्रेला लाखो भाविक येऊन दर्शन घेतात. मात्र, यंदा ...

Distribution of Mahaprasada on the occasion of Ashrubaba Maharaj Yatra | आश्रुबाबा महाराज यात्रेनिमित्त महाप्रसादाचे वितरण

आश्रुबाबा महाराज यात्रेनिमित्त महाप्रसादाचे वितरण

दरवर्षी जाफ्राबाद येथे आश्रुबाबा महाराज यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यात्रेला लाखो भाविक येऊन दर्शन घेतात. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे यात्रा रद्द करण्यात आली होती. हरिनाम सप्ताहासह विविध कार्यक्रम न घेता छोट्या स्वरुपात धार्मिक विधी पार पडले. सर्वप्रथम आश्रुबाबा महाराजांच्या मूर्तिला दहिदुधाने अभिषेक करण्यात आला. राजश्री जाधव, ऋषिकेश जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, डॉ. सुनिता मापारी, बाजार समितीचे सभापती संतोष मापारी, जि.प.चे माजी सदस्य सुनील सुलताने यांनी महापूजा केली. यावेळी जि.प. अध्यक्षा मनीषा पवार, माजी सभापती डॉ. प्रदीप मोरे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख भगवान सुलताने, रवि आहेर, संस्थानचे अध्यक्ष किशोर मापारी, सचिव अशोकराव पोफळे, बबनराव ओव्हर, डॉ. दयानंद ओव्हर, रमेश हाडे उपस्थित होते.

Web Title: Distribution of Mahaprasada on the occasion of Ashrubaba Maharaj Yatra