शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

महामार्ग विस्तारीकरणात मोजणीच्या गोंधळाने अनुदानात अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:33 AM

नांदुरा: सन २0११-१२ मध्ये सुरू झालेली भूमी अभिलेख कार्यालयाची मोजणी व संयुक्त मोजणी अहवाल तयार होऊन आता तब्बल पाच ते सहा वर्षांचा कालावधी उलटला असला तरी अद्यापही काही ठिकाणच्या संयुक्त मोजणी अहवालातील गोंधळामुळे शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत. शेतकर्‍यांची एकत्र नावे, क्षेत्रफळात तफावत तर काही शेतकर्‍यांचे क्षेत्र संपादित होत असूनही संयुक्त मोजणी अहवालात दाखविलेच नसल्याने काही शेतकर्‍यांना मोबदल्यापासून अद्यापही वंचित राहावे लागले आहे. 

ठळक मुद्देवेगवेगळ्या अधिकार्‍यांकडून वेगवेगळे नियम

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: सन २0११-१२ मध्ये सुरू झालेली भूमी अभिलेख कार्यालयाची मोजणी व संयुक्त मोजणी अहवाल तयार होऊन आता तब्बल पाच ते सहा वर्षांचा कालावधी उलटला असला तरी अद्यापही काही ठिकाणच्या संयुक्त मोजणी अहवालातील गोंधळामुळे शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत. शेतकर्‍यांची एकत्र नावे, क्षेत्रफळात तफावत तर काही शेतकर्‍यांचे क्षेत्र संपादित होत असूनही संयुक्त मोजणी अहवालात दाखविलेच नसल्याने काही शेतकर्‍यांना मोबदल्यापासून अद्यापही वंचित राहावे लागले आहे.  महामार्ग क्र.६ च्या विस्तारीकरणात मलकापूर उपविभागा अंतर्गत आतापर्यंत २५ गावामधील शेतकर्‍यांची जमीन संपादित करण्यात आली असून, एकूण ४७ निवाडे पारीत करण्यात आले आहेत. संपादित होणार्‍या १४७ हेक्टर पैकी १0३ हेक्टर क्षेत्रासाठी १0८ कोटी रुपयांचा मोबदला वाटप करण्यात आला आहे.सन २0१३ मध्ये मंजूर निवाड्यात शेताच्या कर आकारणीनुसार ठरलेल्या गटातील संपादित जमिनीसाठी ग्राहय़ धरलेल्या दरापेक्षा त्यानंतर तीन वर्षांनी २0१६ मध्ये मंजूर निवाड्यात त्याच शेतकर्‍यांच्या त्याच गटातील संपादित जमिनींना २0१३ पेक्षा कमी दर ग्राहय़ धरल्याने रेडीटेकनरचे रेट कमी कसे झाले, असा संभ्रम शेतकर्‍यांमध्ये आहे. २0१३ मध्ये झालेले निवाडे हे राष्ट्रीय महामार्ग अधिनियम १९५६ नुसार झाले आहेत; परंतु १ जानेवारी २0१५ पासून ‘भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियमन २0१३ हा नवा कायदा राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित जमिनींना लागू झाल्याने १ जानेवारी २0१५ नंतरचे निवाडे या कायद्यानुसार होणे आवश्यक आहे. संयुक्त मोजणी अहवालात बर्‍याच शेतकर्‍यांचे होणे आवश्यक आहे. संयुक्त मोजणी अहवालात बर्‍याच शेतकर्‍यांचे बांधकामाचे व इतर व्यावसायिक  नुकसानीचा समावेश नसल्याने त्या मोबदल्यापासूनही शेतकरी वंचित आहेत. २0१६ मध्ये झालेल्या निवाड्याची ३ (ए) व ३ (डी) अधिसूचना २0१३ मध्ये प्रसिद्ध झालेली असल्याने २0१३ नंतर साधारणत: एका वर्षात निवाडे होणे अपेक्षित असताना २0१६ मध्ये निवाडे झाले व रेडीरेकलरचे दर हे २0१२ चे गृहीत धरण्यात आल्याने आमच्यावर अन्याय झाल्याचे शेतकरी सांगत आहेत, तर सर्व प्रक्रिया नियमानुसार झाल्याची भूमिका अधिकार्‍यांची आहे. मलकापूर व नांदुरा तालुक्यात ऊस, केळी अशी बारमाही बागायती पिके नसल्याने बागायती जमिनीचे दर शेतकर्‍यांना लावण्यात आले नाहीत; परंतु विहिरी, बोअरवेल असूनही बर्‍याच शेतकर्‍यांना हंगामी बागायती ऐवजी कोरडवाहूचे दर लावल्याने शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे.

संभाव्य बिनशेती जमिनी गृहीत धराव्यातवास्तविक महामार्गात संपादित होणारी संपूर्ण जमीन ही मार्गालगतचीच असल्याने भविष्यात या जमिनींचा उद्योग व्यवसायांकरिता बिनशेती उपयोग होऊ शकतो. त्यामुळे या सर्व जमिनींना ‘संभाव्य बिनशेती जमिनी’ गृहीत धरून जमिनीचे दर लावण्यास हवे, अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे.

महामार्गासाठी संपादित जमिनींच्या मोबदला वाटपाच्या दरात सर्वच शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच २0१६ च्या निवाड्यात २0१२ चे दर गृहीत धरले आहेत. सदर नुकसानीबाबत दाद मागणार आहे.- रमेश अढाव, शेतकरी, धानोरा

राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन व मोबदल्याबाबत शेतकर्‍यांच्या काही हरकती, समस्या असल्यास जिल्हाधिकारी हे लवाद अधिकारी असून, त्यांच्याकडे शेतकर्‍यांची हरकती, समस्या दाखल करव्यात.- सुनील विंचनकरभूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, मलकापूर

टॅग्स :Nanduraनांदूराhighwayमहामार्ग