‘गणराया २0१३’ पुरस्काराचे वितरण
By Admin | Updated: August 11, 2014 22:55 IST2014-08-11T22:55:41+5:302014-08-11T22:55:41+5:30
जळगाव जामोद : पोलिसांचा शांततेसाठी उपक्रम

‘गणराया २0१३’ पुरस्काराचे वितरण
जळगाव जामोद : स्थानिक पोलिस स्टेशनच्यावतीने गतवर्षी झालेल्या गणेश उत्सवासाठी जाहीर केलेल्या गणराया पुरस्काराचे वितरण ९ ऑगस्ट रोजी करण्यात आले. स्थानिक पो.स्टे.च्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.डॉ.संजय कुटे तर मंचावर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, ठाणेदार एम.एस. भोंगे, इज्जद बेग, न.प.उपाध्यक्ष तुकाराम काळपांडे, मुख्याध्यापक दांडगे, भारसाकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ.डॉ.संजय कुटे व मान्यवरांच्या हस्ते जळगाव शहरातून प्रथम पुरस्काराचे मानकरी सूर्यवंशी गणेश मंडळ चौभारा, द्वितीय जय गणेश मंडळ गोबजी खेल, तृतीय श्रीराम गणेश मंडळ अयोध्या नगर त्यानंतर आकर्षक मूर्ती, उत्कृष्ट सजावट व समाज प्रबोधनासाठी सूर्यवंशी मंडळ यांना रोख बक्षीस, ढाल, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. तसेच जामोद येथे सुध्दा ही स्पर्धा राबविण्यात आली होती. यामध्ये प्रथम संभाजी गणेश मंडळ, द्वितीय अष्टविनायक गणेश मंडळ तर तृतीय बक्षीस बाल गणेश मंडळास देण्यात आले. यानंतर निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांनाही बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला गणेश मंडळाचे अध्यक्ष, विजेते स्पर्धक यांच्यासह मनसे जिल्हाप्रमुख गजानन वाघ, सुनील भगत, सौ.कांडलकर, सौ.परवीन देशमुख, सौ.उर्मिला कोकाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. आभार प्रदर्शन मुबडे यांनी केले.