राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:24 IST2021-06-17T04:24:08+5:302021-06-17T04:24:08+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव व त्यांचे सहकारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम ...

Distribution of food grains on the occasion of Raj Thackeray's birthday | राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धान्य वाटप

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धान्य वाटप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव व त्यांचे सहकारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करत असतात. यावर्षीसुद्धा तालुक्यातील बाभूळखेड येथील गोरगरिबांना गहू व तांदूळ वाटप करण्यात आले. वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना फळ वाटप करून राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, तर पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेता, मेहकर शहरातील पतितपावन मुक्तिधाम येथे १०१ रोपांचे वृक्षारोपण केले. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष संतोष अंभोरे, तालुका उपाध्यक्ष शत्रुघन चेके, तालुका उपाध्यक्ष गणेश पऱ्हाड, तालुका संघटक अंकित पाटील, अविनाश बचाटे, मनसे विद्यार्थी सेना शहरअध्यक्ष आदिनाथ सुरुशे, ज्ञानेश्वर गुंजकर, गणेश रासकर, अनिकेत लाडूकर, सुदाम मानघाले, भागवत जाधव, आशीष जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वा़.प्र.)

Web Title: Distribution of food grains on the occasion of Raj Thackeray's birthday