शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात २५ टक्के पीक कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 12:37 IST

बुलडाणा: जिल्ह्यातील पात्र एक लाख १५ हजार ६४२ शेतकऱ्यांपैकी २५ टक्के शेतकऱ्यांना २३२ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे

बुलडाणा: जिल्ह्यातील पात्र एक लाख १५ हजार ६४२ शेतकऱ्यांपैकी २५ टक्के शेतकऱ्यांना २३२ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, पीक कर्जाची अवश्यकता असलेल्या तीन लाख ३३ हजार ९६५ शेतकºयांपैकी प्रत्यक्षात २९ हजार ३८३ शेतकºयांन पीक कर्ज वाटप झाले असून त्याची टक्केवारी मात्र ही अवघी नऊ टक्के आहे.मध्यंतरी बुलडाण्यात झालेल्या बैठकीत पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने सुचना दिल्या होत्या. त्यानुषंगाने यंत्रणा सध्या व्यस्त आहे. त्यातच पीक कर्ज पूनर्गठणाची मुदत ३१ जुलै रोजी संपली आहे. त्याचा अंतिम हवाल आला नसला तरी शेतकºयांच्या संमतीशिवाय पीक कर्जाचे पूर्नगठण बँकांना करता येत नाही. त्यामुळे तुर्तास तरी पूनर्गठणाचा हा आकडा ही १२०० शेतकºयांच्या पुढे गेला नसल्याची शक्यता आकडोरीवरून निर्माण होत आहेत. वास्तविक बुलडाणा जिल्ह्यातील तीन लाख ३३ हजार ९६५ शेतकºयांना एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट देण्यात आले आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात २९ हजार ३८३ शेतकºयांनाच पीक कर्ज वाटप झाले आहे. कर्जमाफी योजनेअंतर्गत अनेक शेतकºयांनी वनटाईम सेटलमेंट न केल्यामुळे अनेक शेतकºयांना यंदा पीक कर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात झालेले पीक कर्ज वाटपाचा टक्का तुलनेने कमी दिसत आहे. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना यंदा दोन लाख ६६ हजार ५२७ शेतकºयांना एक हजार २०४ कोटी ६३ लाख रुपयांचे कर्ज वाटपाचे उदिष्ट देण्यात आले असून त्यापैकी या बँकांनी २९ जुलै २०१९ पर्यंत १८ हजार १२ शेतकºयांना १३५ कोटी ३८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्याची टक्केवारी ही सात टक्के आहे दरम्यान व्यापारी बँकांनी दोन हजार ४९१ शेतकºयांना ४० कोटी २६ लाख ९२ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. या बँकांना प्रत्यक्षात २६ हजार ७६६ शेतकºयांना २४० कोटी ८९ लाख ४० हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करावयाचे आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने तीन हजार ७३१ शेतकºयांना ३१ कोटी २७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले असून त्यांना मिळालेल्या एकूण उदिष्टाच्या ते १२ टक्के वाटप झाले आहे. दुसरीकडे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने पाच हजार १४९ शेतकºयांना २५ कोटी ८६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. या बँकेला नऊ हजार ४५० शेतकºयांना २८० कोटी ९९ लाख ८० हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करावयाचे आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbuldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी