अपघात दाव्याची  १० लाख रक्कम वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 13:28 IST2017-10-04T13:28:27+5:302017-10-04T13:28:36+5:30

Distribution of 10 lakhs of accidental claims | अपघात दाव्याची  १० लाख रक्कम वितरित

अपघात दाव्याची  १० लाख रक्कम वितरित


बुलडाणा : जिल्हा हिवताप कार्यालय  आस्थापनेवरील आरोग्य सहाय्यक प्रकाश नारायण अंभोरे जलंब येथे कार्यरत असताना त्यांचा १५ एप्रिल रोजी नांदूरा येथे घरी जात असतांना अपघाती मृत्यू झाला. त्या अनषंगाने राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत लाभाकरीता जिल्हा हिवताप अधिकारी एस.बी.चौहाण  यांनी पाठपुरावा करून अपघात योजनेखाली देय विमा दाव्याची रक्कम १० लाख योजनेचे प्रकाश अंभोरे यांच्या पत्नी श्रीमती आशा अंभोरे यांना ३ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई शिवचंद्र तायडे व जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ.शिवाजी पवार यांचेहस्ते प्रदान करण्यात आली. याप्रसंगी एस.बी. चौहाण उपस्थित होते.

Web Title: Distribution of 10 lakhs of accidental claims