थकबाकीदार संचालकांवर अपात्रतेची कु-हाड

By Admin | Updated: November 20, 2014 23:04 IST2014-11-20T23:03:38+5:302014-11-20T23:04:03+5:30

सेवा सहकारी सोसायट्यांचे तब्बल १ हजार ३५0 संचालकच स्वत: थकबाकीदार.

Disqualification of the defaulters | थकबाकीदार संचालकांवर अपात्रतेची कु-हाड

थकबाकीदार संचालकांवर अपात्रतेची कु-हाड

बुलडाणा : शेतकर्‍यांना कर्ज वितरण करून वसुलीसाठी तगादा लावणार्‍या जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे तब्बल १ हजार ३५0 संचालकच स्वत: थकबाकीदार असल्याची माहिती हाती आली आहे. या संचालकाकडे असलेली थकबाकी त्वरित भरण्याचे निर्देश देण्यात आले असून, थकबाकी न भरल्यास आगामी निवडणुकीसाठी हे संचालक अपात्र ठरविण्याची कार्यवाही सहकार विभाग करणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात एकूण ५७0 विविध सहकारी कार्यकारी सेवा सोसायट्या आहेत. प्रत्येक तालुक्यात या सोसायट्यांची संख्या २0 पेक्षा जास्त आहे. या सेवा सोसायट्यांमार्फत शेतकर्‍यांना पीक व मुदती कर्जाचे वितरण केले जाते. शे तकर्‍यांच्या कर्जाचा संपूर्ण हिशेबच सेवा सोसायट्याकडे असतो. तर सेवा सोसायट्या या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतात. ग्रामीण भागात सेवा सोसायट्यांना वेगळे महत्त्व आहे. त्यासाठी निवडणुका घेतल्या जातात. सहकारातील अनेक दिग्गज नेते याच सेवा सोसायट्यांमधूनच घडले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ५७0 सेवा सोसायट्या असून, या सर्व सोसायट्यांवर प्रत्येकी १३ संचालक सार्वत्रिक निवडणुकीद्वारे निवडले जातात. ज्या सोसायट्यांच्या मुद ती संपल्या. अशा ३७ सोसायट्यांच्या यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत निवडणुका होऊ घातल्या आहेत. या सोसायटीच्या निवडणुकीसाठी सहकार क्षेत्रातील स्थानिक ने त्यांनी तयारीही सुरू केली आहे. सहकार प्रशासनही मतदार याद्या अपडेट करण्यासह निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या दरम्यान शेकडो संचालकांकडेच कर्जाच्या कोट्यवधी रुपयांची रक्कम थकीत आहे. एरव्ही हे संचालक शेतकर्‍यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावतात; मात्र सध्या ते स्वत:च सेवा सोसायट्यांचे थकबाकीदार आहेत. ज्या संचालकाकडे थकबाकी आहे त्यांना होऊ घातलेल्या सोसायटीच्या निवडणुकीत सहभाग घेता येणार नाही. विशेष म्हणजे या संचालकांचे मतदार यादीतच नाव नोंदविले जाणार नसल्याचा निर्णय सहकार विभागाने घेतल्यामुळे हे संचालक अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे अशा थकबाकीदार संचालकांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ५७0 सहकारी सोसायट्या आहेत. तर २१ हजार ६0८ सभासद संख्या आहे. यामध्ये ३७ सोसायट्यांच्या निवडणुका येत्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस होऊ घातल्या आहेत. यामध्ये ब वर्ग सोसायट्यांच्या ११ तर क वर्गच्या २६ सोसायट्यांच्या निवडणुका होणार आहेत. यापैकी १ हजार ३५0 संचालक थकबाकीदार असल्याची माहिती असून, या थकबाकीदार संचालकांवर अपात्रतेची कार्यवाही होण्याची शक्यता आहे. त्यासाठी या संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Disqualification of the defaulters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.