पोळ्यामध्ये वाद; १५ जणांविरुद्ध गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:27 IST2017-08-23T00:26:55+5:302017-08-23T00:27:13+5:30

Disputes in the hive; Crime against 15 people | पोळ्यामध्ये वाद; १५ जणांविरुद्ध गुन्हा 

पोळ्यामध्ये वाद; १५ जणांविरुद्ध गुन्हा 

ठळक मुद्देउकळी येथे पोळा सणाच्या दिवशी तोरण तोडण्याच्या कारणावरून वादपरस्परविरोधी १५ जणांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल


लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : उकळी येथे पोळा सणाच्या दिवशी तोरण तोडण्याच्या  कारणावरून वाद होऊन परस्परविरोधी १५ जणांविरुद्ध मंगळवारी  गुन्हा दाखल करण्यात आला.
उकळी येथील सुरेश बोरे यांच्यासोबत विशाल गुंजकर, गोपाल  आश्रू गुंजकर, गोपाल सीताराम गुंजकर, प्रकाश गुंजकर, सुखदेव  गुंजकर यांनी गैरकायदा मंडळी जमवून तोरण तोडणे व बैलाचा ध क्का लागल्याच्या कारणावरून सुरेश बोरे याला मारहाण केली.  यासंदर्भात सुरेश बोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल गुंजकर,  गोपाल आश्रू गुंजकर, गोपाल सीताराम गुंजकर, प्रकाश गुंजकर,  सुखदेव गुंजकर यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. तसेच रवी बोरे, गजानन खडसे, बबन बोरे,  केशव बोरे, पांडुरंग गिर्‍हे, विशाल सावंत, बबन खडसे, वसंता  बोरे, विष्णू सासवडकर, काशीनाथ सासवडकर, ज्ञानेश्‍वर पातळे  यांनी विशाल अशोक गुंजकर यांच्यासोबत वाद घालून त्याला  मारहाण केली. विशाल गुंजकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रवी  बोरे, गजानन खडसे, बबन बोरे, केशव बोरे, पांडुरंग गिर्‍हे,  विशाल सावंत, बबन खडसे, वसंता बोरे, विष्णू सासवडकर,  काशीनाथ सासवडकर, ज्ञानेश्‍वर पातळे यांनी विशाल अशोक  गुंजकर यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात  आला.

Web Title: Disputes in the hive; Crime against 15 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.