शेजाऱ्यांमध्ये वाद; एकाचे डोके फोडले!
By Admin | Updated: April 19, 2017 00:09 IST2017-04-19T00:09:35+5:302017-04-19T00:09:35+5:30
खामगाव: क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद होऊन एकाचे काठीने डोके फोडल्याची घटना रावण टेकडी भागात घडली.

शेजाऱ्यांमध्ये वाद; एकाचे डोके फोडले!
खामगाव: क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद होऊन एकाचे काठीने डोके फोडल्याची घटना रावण टेकडी भागात घडली. पोलिसांनी याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बबन गुलाबराव अंभोरे (वय ५०) यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, ते काल रात्री १० वाजता छतावर चढून घरामागे पाणी टाकण्यासाठी गेले असता शेजारी पुंडलिक सूर्यवंशी याने तू माझ्या अंगणात का आला’ असे म्हणून वाद घातला व डोक्यात काठी मारून जखमी केले. या तक्रारीवरून पोलिसांनी पुंडलिक सूर्यवंशी याने ‘तू माझ्या अंगणात का आला’ असे म्हणून वाद घातला व डोक्यात काठी मारून जखमी केले. या तक्रारीवरून पोलिसांनी पुंडलिक सूर्यवंशीविरुद्ध कलम ३२४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. तर निर्मला पुंडलिक सूर्यवंशी (वय ३५) यांनी तक्रार दिली की, शेजारी बबन गुलाबराव अंभोरे व बबन अंभोरे या दोघांनी लहान मुलांचा चेंडू त्यांच्या दरवाजाला लागल्याच्या कारणावरून वाद घालून माझ्या मुलाला चापटा- बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून अंभोरे पिता-पुत्राविरुद्ध कलम ३२३, ५०४, ५०६ भादंविनुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.