मलकापूर पांग्रा येथील पोलीस चौकी समोरच वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:33 IST2021-02-12T04:33:05+5:302021-02-12T04:33:05+5:30
मलकापूर पांग्रा येथे दर गुरुवारी आठवडी बाजार असतो. त्यामुळे परिसरातील २५ ते ३० खेड्यातील नागरिक आठवडाभराचा बाजार करण्यासाठी येतात. ...

मलकापूर पांग्रा येथील पोलीस चौकी समोरच वाद
मलकापूर पांग्रा येथे दर गुरुवारी आठवडी बाजार असतो. त्यामुळे परिसरातील २५ ते ३० खेड्यातील नागरिक आठवडाभराचा बाजार करण्यासाठी येतात. महिलाही मोठ्या संख्येने येतात. गावात शांतता राहावी आणि चोरट्यांवर अंकुश बसावा म्हणून तत्कालीन ठाणेदार संग्राम पाटील यांनी जुन्या ग्रामपंचायतमध्ये पोलीस चौकी सुरू केली आहे. परंतु या पोलीस चौकीत बीट जमादार कधीच हजर राहत नाहीत. ५ फेब्रुवारीला मलकापूर पांग्रा येथील अंबादास मुरलीधर बुट्टे यांचे ज्वेलरीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखोचा माल लंपास केला, तर बाळू सोळंके यांच्या ऑटो पार्टचे दुकान फोडून ऑईलच्या पेट्या लंपास केल्या. त्यानंतर ११ फेब्रुवारीला चक्क पोलीस चौकीसमोरच काही नागरिकांनी राडा केल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या अनेक दिवसापासून या पोलीस चौकीत बीट जमादार कधीच येत नसल्याने नागरिकांना धाक राहिला नाही. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन बीट जमादारावर कारवाई करावी, अशी मागणी पांडुरंग कापसे यांनी केली आहे.