शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

चिमुकलीच्या उपचारप्रकरणी रूग्णालय प्रशासन आणि नातेवाईकांमध्ये वाद; अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 15:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  येथील सिल्व्हर सिटी रूग्णालयात उपचार घेतलेल्या सहा वर्षीय चिमुकलीच्या उपचारप्रकरणी रूग्णालय प्रशासन आणि तिच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  येथील सिल्व्हर सिटी रूग्णालयात उपचार घेतलेल्या सहा वर्षीय चिमुकलीच्या उपचारप्रकरणी रूग्णालय प्रशासन आणि तिच्या नातेवाईकांमध्ये वाद उद्भवला आहे. डॉक्टरांनी मृत घोषित केलेली चिमुकली जिवंत निघाल्याचा ‘पेच’ सुटता सुटत नसतानाच, रूग्णालय प्रशासनाकडून सामाजिक बदनामी केल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. तर डॉक्टरांनी सांगितल्यामुळेच चिमुकलीला रूग्णालयातून हलविल्याचा मुलीच्या आईचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथील  अर्पिता दीपक दाभाडे (६) या चिमुकलीचा गुरूवारी सायंकाळी एका वाहनाच्या धडकेमुळे अपघात झाल्यानंतर सिल्व्हरसिटी रूग्णालयात भरती करण्यात आले. शुक्रवारी ती मरण पावल्याचे डॉक्टरांनी तोंडी सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी घरी हलविले. अत्यविधीची तयारी सुरू असतानाच ती जिवंत असल्याचे समजले. त्यामुळे नातेवाईक आणि समाजमनात तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. डॉक्टरांनी सांगितल्यामुळे मुलीला रूग्णालयातून हलविल्याचा दावा नातेवाईकांनी केला.  अर्पिताची आई सरला दाभाडे यांचा एक व्हीडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

अर्पितावर अकोला येथील रूग्णालयात उपचार!अपघातात गंभीर जखमी असलेल्या अर्पिता दाभाडे (६) हीच्यावर अकोला येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच तिच्या नातेवाईकांनी तिला अकोला येथे हलविले.

डॉक्टर दिशाभूल करीत असल्याचा आरोप!रूग्णालयातील डॉक्टर दिशाभूल करीत असल्याचा आरोप चिमुकलीच्या नातेवाईकांनी केला आहे. दोन कोºया वेगवेगळ्या कागदांवर पतीसह नातेवाईकांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या. त्यानंतर त्यावर मजकूर लिहीण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आता डॉक्टरांकडून दिशाभूल केल्याचा जात असल्याचा दावाही चिमुकलीच्या नातेवाईकांनी केला.

अज्ञात आरोपीविरोधात पोलिसात तक्रार!अपघातात जखमी झालेल्या चिमुकलीवर सिल्व्हरसिटी हॉस्पीटलमध्ये १५ नोव्हेंबर रोजी योग्य ते उपचार करण्यात आले. मेंदूला जबर मार लागल्याने चिमुकलीच्या नातेवाईकांना तिच्या प्रकृतीसंदर्भात  माहिती देण्यात आली. तसेच तिला पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आल्याचेही सांगितले. १६ नोव्हेंबर रोजी तिच्या नातेवाईकांनी तिला रूग्णालयातून हलविले. या चिमुकलीच्या नातेवाईकांना कोणतेही मृत्यूप्रमाणपत्र देण्यात आले नाही. दरम्यान, या चिमुकलीच्या नातेवाईकांकडून बदनामी करण्यात आल्याची तक्रार सिल्व्हरसिटी हॉस्पीटलचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. भगतसिंह राजपूत यांनी शहर पोलिसांत दिली. यावरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात कलम ५०५ अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

सिल्व्हरसिटी रूग्णालयात भरती चिमुकलीवर योग्य ते उपचार करण्यात आले. तिच्या नातेवाईकांच्या आरोपामध्ये कोणतेही तथ्य नाही. योग्य ते उपचार केल्यानंतरही नातेवाईकांकडून चुकीची अफवा पसरविण्यात येत आहे. यासंदर्भात शहर पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.-डॉ. भगतसिंह राजपूतमुख्य कार्यकारी अधिकारी, सिल्व्हरसिटी हॉस्पीटल, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावJalgaonजळगावhospitalहॉस्पिटल