धामणगावात जंतुनाशकाची फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:31 IST2021-04-26T04:31:15+5:302021-04-26T04:31:15+5:30
धामणगाव धाड परिसरात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावातील सर्व ...

धामणगावात जंतुनाशकाची फवारणी
धामणगाव धाड परिसरात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावातील सर्व भागांमध्ये तसेच घरोघरी फवारणी केली. नाली रस्त्यावर सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. गावातील नागरिकांनी खबरदारी घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घेत आपले व आपल्या कुटुंबाचे तसेच गावाचे रक्षण करावे, दररोज हात स्वच्छ धुवावे तसेच मास्कचा वापर करावा, गावातील व्यापारी, दुकानदार यांनी दिलेल्या वेळेमध्ये आपली दुकाने सुरू ठेवावीत. विनाकारण गावामध्ये फिरू नये, शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे व ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच दुर्गाबाई सुरडकर, उपसरपंच समाधान पाटील यांनी केले आहे. यावेळी दिलीप सुरडकर, अमोल देवकर, आनंद अपार, अनिल सुरडकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित हाेते.