डाेणगावातील प्रत्येक वार्ड निर्जंतुक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:34 IST2021-04-24T04:34:52+5:302021-04-24T04:34:52+5:30
डाेणगाव : गत काही दिवसांपासून परिसरात काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे. डाेणगावातही माेठ्या प्रमाणात काेराेना रुग्ण वाढले आहेत. ...

डाेणगावातील प्रत्येक वार्ड निर्जंतुक करा
डाेणगाव : गत काही दिवसांपासून परिसरात काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे. डाेणगावातही माेठ्या प्रमाणात काेराेना रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे गावातील प्रत्येक वार्ड निर्जंतुक करण्याची मागणी हाेत आहे.
राज्य महामार्गावर असलेल्या डाेणगाव व परिसरात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील वर्षी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रतिबंधित क्षेत्र तयार करून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग राबविली होती. एवढेच नव्हे, तर संपूर्ण गाव फवारणी करून निर्जंतुकीकरण केले होते, परंतु या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी डोणगांव ग्रामपंचायतीच्या वतीने कोणतेच प्रतिबंधित उपाय केलेले नाही. त्यामुळे डोणगांव येथे दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने, त्वरित संपूर्ण गावात फवारणी करून निर्जंतुकीकरण करावे व प्रतिबंधित क्षेत्र तयार करावे, अशी मागणी हाेत आहे.