शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

मोदींच्या पराभवाची चर्चा चहाच्या टपरीवरून होईल : शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 17:27 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा परभाव का झाला? याची चर्चा चहाच्याच टपरीवर करताना दिसतील

देऊळगाव मही (जि. बुलडाणा) : ज्यांनी चहाचं भांडवल करून जनसामान्यांना फसवले तीच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा परभाव का झाला? याची चर्चा चहाच्याच टपरीवर करताना दिसतील, अस भाकीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी देऊळगाव मही येथे केले. स्वत:ला गांधीवादी व लोकशाहीचे पुजारी म्हणवणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांच्या प्रश्नासाठी अधिवेशन बोलावण्याची आमची मागणी मान्य करावीअसे सांगत शेतकर्यांनी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी निकराने लढा द्यावा. २०१९ ची निवडणूक जात-धर्मावर लढणार्या हिसका दाखवा, असे आवाहनही खा. राजू शेट्टी यांनी पुढे बोलताना केले.

महाराष्ट्र दिनापासून धुळे जिल्ह्यातील वखरण येथून ही ‘शेतकरी सन्मान यात्रा’ सुरू झाली असून पाच मे रोजी रात्री ती देऊळगाव मही येथे पोहोचलीहोती.  त्यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, कवी ज्ञानेश वाकुडकर,युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडगूले, महिला प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, घनशाम चौधरी, माणिकराव कदम, गजानन बंगाळे पाटील, राज्य उपाध्यक्ष सयाजीमोरे, अमोल हिप्परगे, अनिल पवार, राज्य उपाध्यक्षा शर्मीला येवले, बबनराव चेके यांच्यासह अन्य उपस्थित होते.

ही लढाई परिवर्तनाची असून नेतृत्व स्थापन करण्याची नाही. शेतकर्यावर आलेली ही वेळ सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आली आहे. सरकारचे आयात धोरण हे  शेतकर्यांसाठी मारक ठरत आहे. स्वामीनाथ आयोगाची शिफारस स्वीकरली असती तर वेतन आयोगाप्रमाणे सरकारला फरक द्यावा लागला असता. जीएसटी, नोटबंदीचा शेतकर्यानां फटका बसला आहे. शेतकर्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी १९३ संघटना एकत्र आल्या असून शेतकरी प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणीसाठी दहा मे रोजी राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक लाख सह्यांचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीNarendra Modiनरेंद्र मोदी