भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:41 IST2021-09-07T04:41:05+5:302021-09-07T04:41:05+5:30

चंद्रकांत पाटील ३ सप्टेंबर रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आले होते. दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी औरंगाबादकडे जात असताना त्यांनी आ. ...

Discussion among BJP office bearers | भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा

भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा

चंद्रकांत पाटील ३ सप्टेंबर रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आले होते. दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी औरंगाबादकडे जात असताना त्यांनी आ. महाले यांच्या घरी भेट दिली. यावेळी आ. श्वेता महाले व परिवाराने कौटुंबिक सत्कार केला आणि कोणताही मोठा कार्यक्रम किंवा भाषण न करता केवळ कार्यकर्त्यांशी त्यांनी हितगुज साधली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आ. आकाश फुंडकर, सतीश गुप्त, माजी आ. विजयराज शिंदे, प्रदेश कार्यकारिणी ॲड. विजय कोठारी, प्रकाश महाराज जवंजाळ, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंग राजपूत, रामकृष्ण शेटे, प्रेमराज भाला, ज्येष्ठ नेते रामदास देव्हडे, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुका अध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, पं. स. सभापती सिंधु तायडे, उपसभापती शमशाद पटेल, उपनगराध्यक्ष वजीराबी अनिस शेख, नगरसेविका विमल देव्हडे, अर्चना खबुतरे, व्दारका भोसले, सुनीता भालेराव, नगरसेवक विजय नकवाल, अंकुशराव पाटील, सुरेंद्र पांडे, सुहास शेटे, शेख अनिस शेख बुढन, नगरसेवक गोविंद देव्हडे, शैलेश बाहेती, नामु गुरूदासनी, अनुप महाजन, सुभाषअप्पा झगडे, ऋषभ पाटील, संजय अतार, सुदर्शन खरात, सुधाकर काळे, संजय महाले, प्रा. वीरेंद्र वानखेडे, डॉ. आशुतोष गुप्त, सागर पुरोहित आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Discussion among BJP office bearers