आपत्तीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

By Admin | Updated: May 5, 2015 00:07 IST2015-05-05T00:07:59+5:302015-05-05T00:07:59+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील १0२ बाधित गावे मदतीपासून वंचित.

The disaster affected farmers are deprived of help | आपत्तीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

आपत्तीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

मनोज पाटील / मलकापूर: नोव्हेंबर ते मार्च दरम्यान झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात जिल्ह्यातील १0२ बाधित गावातील शेतकर्‍यांना प्रशासनाने नोंदविलेल्या मागणीनुसार अद्यापपावेतो अनुदान प्राप्त झाले नसल्याने तब्बल १२४0 बाधित शेतकरी अनुदानापासून वंचीत आहेत.
तर एप्रिल महिन्यातील नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू असून ६१६ बाधित गावातील प्राथमिक नुकसानीचे क्षेत्रफळ ७७४९ हेक्टर काढण्यात आले आहे. या वस्तुस्थितीदर्शक पंचनाम्यानुसार या क्षेत्राचा संयुक्त अहवाल शासनास सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे. पुर्वीचे प्रलंबित अनुदान व आताच्या अहवालानुसारचे अनुदान शेतकर्‍यांना मिळालेच नसल्याने जिल्ह्यातील हजारो बाधित शेतकरी आजही पीक नुकसानीचे अनुदान मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
नोव्हेंबर ते डिसेंबर १४ दरम्यान मोताळा तालुक्यातील ३ गावांना अतवृष्टी व वादळी पावसाचा तडाखा बसला. या तडाख्यात २३ शेतकरी बाधित झाले. या शेतकर्‍यांच्या केळी पिकांचे नुकसान ५0 टक्क्यापेक्षा अधिक झाले. या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाने नैसर्गिक विभागाकडे पाठविले आहेत. तर डिसेंबर २0१४ ते जानेवारी २0१५ दरम्यान अवेळी पाऊस, वादळ व गारपीटीने बुलडाणा, खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, मेहकर व मोताळा तालुक्यातील २५ गावे बाधित झाली. या गावातील १00२ बाधित शेतकरी असून मार्च महिन्यातील वादळी पाऊस व गारपीटीच्या तडाख्यात बुलडाणा, मलकापूर, जळगाव जामोद व मेहकर या तालुक्यातील ७४ गावे बाधित होवून २१५ शेतकरी बाधित झाले. ४ फेब्रुवारी २0१५ च्या शासन निर्णयानुसार एकुण ७५.३0 लक्ष रूपयांची तर १४ एप्रिल २0१५ च्या शासन निर्णयानुसार १६ लाख ९५ हजार ८५0 रूपये अनुदान मागणी जिल्हा नैसर्गिक आपत्ती विभागाने शासनस्तरावर नोंदविली आहे.

Web Title: The disaster affected farmers are deprived of help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.