शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस महासंचालकांकडून ‘लोकमत’ वृत्तांची दखल! कारवाई करण्याचे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 15:48 IST

‘वाहतूक पोलिसांची खाबुगिरी’ आणि ‘उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात महिलेची छेडछाड’या दोन वृत्तांची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून थेट दखल घेण्यात आली.

खामगाव: ‘वाहतूक पोलिसांची खाबुगिरी’ आणि ‘उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात महिलेची छेडछाड’या दोन वृत्तांची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून थेट दखल घेण्यात आली. या दोन्ही घटनांबाबत योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी बुलडाणा जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलेत. त्यामुळे पोलिस प्रशासनासोबतच कृषी विभागात खळबळ उडाली आहे.वाहतूक पोलिसांच्या खाबुगिरीचे सचित्र वृत्त ‘लोकमत’मध्ये ‘वाहतूक पोलिसांच्या खाबुगिरीला लगाम लागेना!’ या मथळ्याखाली बुधवार २९ आॅगस्ट रोजी प्रकाशित केले होते. तर गुरूवार ३० आॅगस्ट रोजी ‘उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात महिलेची छेडछाड’ हे वृत्त प्रकाशित केले. उपरोक्त दोन्ही बातम्या ‘आॅनलाईन लोकमत’लाही प्रसारीत करण्यात आल्या. तसेच या बातम्यांची लिंक ‘डिजिपी महाराष्ट्र’ या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटसोबत शेअर करण्यात आली. त्यानंतर या दोन्ही प्रकरणांची राज्याचे पोलिस महासंचालक यांनी गंभीरतेने दखल घेतली. त्यांच्या  ‘डिजिपी महाराष्ट्र’ या ऑफिशियल अकाऊंटवरून दोन्ही घटनांसंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. 

‘लोकमत’च्या निर्भिडतेचे कौतुक!पोलिसांच्या खाबुगिरीचा भंडाफोड केल्याबद्दल ‘लोकमत’चे विविध स्तरावरून कौतुक होत आहे. पोलिसांची खाबुगिरी उघड करण्यासोबतच महिलेवरील अत्याचाराला वाचा फोडल्याबद्दल ‘सोशल’ मिडीयावर ‘लोकमत’चे कौतुक होत आहे. दरम्यान, आता राज्याच्या पोलिस महासंचालकांकडूनही ‘लोकमत’ची दखल घेण्यात आली आहे.

 

टॅग्स :khamgaonखामगावPoliceपोलिस