दिराने केला वहिनीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:32 IST2020-12-29T04:32:51+5:302020-12-29T04:32:51+5:30
बुलडाणा : चाेरीचा रिपाेर्ट का दिला, यावरून वहिनीला दिराने मारहाण केल्याची घटना बुलडाणा तालुक्यातील भादाेला येथे २७ डिसेंबर राेजी ...

दिराने केला वहिनीचा खून
बुलडाणा : चाेरीचा रिपाेर्ट का दिला, यावरून वहिनीला दिराने मारहाण केल्याची घटना बुलडाणा तालुक्यातील भादाेला येथे २७ डिसेंबर राेजी रात्री घडली. उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या वहिनीचा औरंगाबाद येथे मृत्यू झाला. या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण ठाण्यात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेबी संतोष गवई (५५) असे मृत महिलेचे नाव आहे.
बुलडाणा तालुक्यातील ग्राम भादोला येथील आरोपी राजू चिंकाजी गवई याने वहिनी बेबी संतोष गवई यांच्याबराेबर चोरीचा रिपोर्ट का दिला, या कारणावरून २७ डिसेंबरच्या सायंकाळी वाद घातला. तसेच लाकडी दांड्याने मारहाण केली. यामध्ये बेबी गवई गंभीर जखमी हाेत्या. त्यांना तातडीने बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मार जास्त लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात भरती केले, परंतु उपचारादरम्यान रात्री त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला ३०७ नुसार गुन्हा दाखल केला हाेता. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर २८ डिसेंबर राेजी बुलडाणा ग्रामीण पाेलिसांनी आरोपी राजू चिंकाजी गवईविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकर करीत आहेत.