शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गजानन महाराज संस्थानतर्फे दररोज ५ हजार लोकांना अन्नदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 01:26 IST

रोज ५ हजार लोकांना अन्नदान : श्री आनंद विसाव्यात पाचशेच्यावर खाटांची केली व्यवस्था

गजानन कलोरे 

शेगाव (बुलडाणा) : येथील श्री गजानन महाराज संस्थानतर्फे कम्युनिटी किचन या उपक्रमाच्या माध्यमातून दैनंदिन गरजूंना ५ हजार जेवणाच्या पाकिटांचे वितरण केले जात आहे. याशिवाय भविष्यातील धोका लक्षात घेऊन आपत्ती काळात रुग्णांसाठी येथील श्री आनंद विसाव्यात पाचशेच्यावर खाटांचीदेखील अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे.

‘विदर्भाची पंढरी’ अशी ओळख असलेल्या संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर संस्थानही लॉकडाउनच्या काळात जनसामान्यांच्या मदतीसाठी धावून आले आहे. ‘कम्युनिटी किचन’मार्फत दररोज २ हजार जेवणाच्या पाकिटांचे वितरण सुरू आहे. शेगावातील निवारागृहे, जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना पुरविण्यात येत आहेत. शहरात अडकून पडलेले मजूर, सामाजिक संस्थांनी शोधून काढलेल्या गरजू व्यक्तींनाही घरपोच भोजन पाकिटे देण्यात येत आहे. २ एप्रिलपासून बुलडाणा येथे सकाळी १ हजार व संध्याकाळी १ हजार असे भोजन पाकिटांचे वितरण सुरू आहे.दगडूशेठ गणपती ट्रस्टचा गरजूंना मदतीचा हातपुणे : येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने पुण्यातील गरजू नागरिक, संस्था, रुग्णालयांना मदतीचा हात दिला आहे.च्ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीत ५० आयसीयू आणि १०० आयसोलेशन बेड तयार करण्यात येत आहेत.च्सुमारे ४ हजार जणांची दोन्ही वेळची विनामूल्य भोजन व्यवस्था करण्यात आली आहे़ अनाथ मुलांची संस्था असलेल्या श्रीवत्सला धान्यरुपी मदत, कासेवाडी वसाहतीतील १ हजार कुटुंंबांना ५ हजार साबणांचे वाटप करण्यात आले आहे़ ट्रस्टतर्फे ६ रुग्णवाहिकांची सोय केली आहे.मुक्त विद्यापीठाचे दहा कोटी रुपयेनाशिक : कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने दहा कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराजbuldhanaबुलडाणा