शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

डिजिटल पद्धतीने अध्ययन झाले सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 18:10 IST

प्राथमिक शाळेने डिजिटल प्रणालीचा अध्यापनासाठी वापर केल्याने विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक सोपे झाले आहे.

- ओमप्रकाश देवकर            मेहकर :   तालुक्यातील देऊळगाव माळी जिल्हा परिषद केंद्रिय मराठी प्राथमिक शाळेने डिजिटल प्रणालीचा अध्यापनासाठी वापर केल्याने विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक सोपे झाले आहे. त्यामुळे शाळेमध्ये गुणवत्ता टिकविणे सोपे झाले असून डिजिटल प्रणालीच्या अध्यापणामुळे व इतर विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक सुविधांमुळे या शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.             येथील जिल्हा परिषद केंद्रिय मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य पार पाडत असताना विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रूजवनही केली असल्याने गावातील पालक समाधानी आहेत. शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर, ज्ञानरचनावादी अक्षर कोपरे, क्षेत्रभेट, उत्तम ग्रंथालय, ई-लर्निंग, खेळण्याचे साहित्य, स्वच्छ प्रसाधनगृह, हँडवॉश, पिण्याचे पाणी, वर्गात बसण्यासाठी सुलभ व्यवस्था आदी गोष्टी शाळेत गेल्यानंतर निदर्शनास येतात. शाळेच्या आवारातील सर्व भिंती बोलक्या झाल्या आहेत. भिंतीवर अंकगणित, भूगोल, मराठी, इंग्रजी मुळाक्षरे आधी रेखाटले असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्या नेहमी-नेहमी नजरेसमोर पडून अध्ययनात त्याची मदत होत आहे. शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार केले जात असून त्यांच्या शालेय पोषण आहाराकडे, मध्यान्न भोजनाकडे शिक्षक स्वत: लक्ष देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती व शाळेची पटसंख्या लक्ष वेधून घेत आहे. या शाळेवर मुख्याध्यापक विजया जगधने, सहायक अध्यापक दिलीप मगर, गजानन मगर, विश्वनाथ मगर, सखाराम बळी, संतोष सावळकर, अरुण बळी, संतोष चोपडे, सुनील मगर, उषा केंधळे  या शिक्षकांसह शालेय व्यवस्थापन समितीचे विशेष शाळेकडे लक्ष असते. यासर्वांची फलश्रृती म्हणून शाळेला आयएसओचे मानांकन मिळाले आहे.  विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, याकरीता पाठांतर केल्यापेक्षा कृतीतून शिकवण्यावर आम्ही सर्वजण भर देत आहोत. विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी डिजिटल वर्गखोल्या सह प्रशस्त ग्रंथालयाची निर्मितीसुद्धा शाळेमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये अध्यापन साहित्यासह इतर बाल गोष्टींची पुस्तके भरण्यात आली आहेत. - विजया जगधने, मुख्याध्यापक, देउळगाव माळी.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा