Differences in orange crop insurance | संत्र्याच्या पीक विम्यात तफावत

संत्र्याच्या पीक विम्यात तफावत

ठळक मुद्दे,३५८ शेतकºयांनी त्यामध्ये सहभाग घेतला.सोनाळा-१ या मंडळालाच सर्वाधिक म्हणजे, ५७,७५० रुपये भरपाई दिली. ६ मंडळांना केवळ १९,२५० रुपये मंजूर केले.

खामगाव : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी काढलेल्या संत्रा पिकाचा विमा देताना मंडळनिहाय मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
जिल्ह्यातील संत्रा उत्पादक तालुक्यातील १७ मंडळांमध्ये शेतकऱ्यांनी २०१९-२० या वर्षात पिकाच्या आंबेबहाराचा विमा काढला. १,३५८ शेतकºयांनी त्यामध्ये सहभाग घेतला. त्या पिकाचा विमा देताना कंपनीने मंडळनिहाय नुकसानभरपाईचे वेगवेगळे निकष लावले. त्यानुसार सोनाळा-१ या मंडळालाच सर्वाधिक म्हणजे, ५७,७५० रुपये तर लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द मंडळात ३८,५०० रुपये भरपाई दिली. त्याचवेळी ६ मंडळांना केवळ १९,२५० रुपये मंजूर केले. दे. राजा, सिं. राजा, अंढेरा, साखरखेर्डा या मंडळात भरपाईच दिली गेली नाही.

Web Title: Differences in orange crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.