डिझेलअभावी बसेस बंद

By Admin | Updated: November 7, 2014 23:27 IST2014-11-07T23:27:35+5:302014-11-07T23:27:35+5:30

मेहकर येथे परिवहन महामंडाळाच्या आगाराचे लाखो रुपयांचे नुकसान.

Diesel farewell buses | डिझेलअभावी बसेस बंद

डिझेलअभावी बसेस बंद

मेहकर ( बुलडाणा) : राज्य परिवहन महामंडळाच्या येथील आगारात डिझेल उपलब्ध नसल्याने जवळपास ४0 एसटी बसेस बंद अवस्थेत आगारात उभ्या आहेत. यामुळे आगाराचे दिवसाकाठी लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या आगाराच्या उत्पन्नात मेहकर आगार हा गेल्या १५ ते २0 वर्षां पूर्वी राज्यात प्रथम क्रमांकावर होता; मात्र दिवसेंदिवस मेहकर आगाराच्या उत्पन्नाचा आकडा इतर आगाराच्या तुलनेत कमी होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून या आगारातील एस.टी. बसमध्ये डिझेल उपलब्ध नसल्याने जवळपास ३५ ते ४0 एसटी बसगाड्या आगार परिसरात बंद अवस्थेत उभ्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विविध मार्गावरच्या बसफेर्‍या कमी झाल्या असून, प्रवाशांचे हाल होत आहेत. त्याचबरोबर बंद असलेल्या एसटी बसेसमुळे राज्य परिवहन महामंडळाचे सुमारे ६ ते ७ लाख रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. याकडे आगार व्यवस् थापकांचेही दुर्लक्ष होत असून, त्यामुळे कर्मचारीही त्रस्त झाले आहेत. अनेक बसेस डिझेलअभावी बंद असल्याने आगारातील कर्मचारी उभ्या असलेल्या एसटी बसेसमधून ५ ते ६ लिटर डिझेल काढून दुसर्‍या एसटी बसला पुरविण्याचे काम करीत आहेत.

*जळगाव जामोद येथे डिझेलचा तुटवडा
जळगाव जामोद येथील बस आगारात दोन दिवसांपासून डिझेलचा तुटवडा पडल्यामुळे बुलडाण्याकडे येणार्‍या तीन फेर्‍या आज रद्द करण्यात आल्या. परिणामी प्रवाशांची गैरसोय झाली.

Web Title: Diesel farewell buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.