डायरियाने इसमाचा मृत्यू
By Admin | Updated: September 7, 2014 00:22 IST2014-09-07T00:22:54+5:302014-09-07T00:22:54+5:30
पाडळी येथील ग्रामस्थाचा डायरियाने मृत्यू, डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप.

डायरियाने इसमाचा मृत्यू
बुलडाणा : येथून जवळच असलेल्या पाडळी येथील हिमंतराव गोविंदा जाधव यांचा डायरियाने मृत्यू झाला. हिंमतराव जाधव असे मृतकाचे नाव आहे.
हिंमतराव जाधव यांना ४ सप्टेबर रोजी अचानक संडास व उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे त्यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना दोन सलाईन दिल्या. त्यांची प्रकृती गंभीर असतानाही डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी इतरत्र हलविण्याचा सल्ला न देता केवळ दोन सलाईन देऊन त्यांना रुग्णालयातून सुटी दिली. त्यामुळे रात्रीतून त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांचे निधन झाले.
येथील डॉक्टरांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊन त्यांना बुलडाणा येथे पुढील उपचारासाठी हलविले असते तर कदाचित हिंमतराव जाधव यांचे प्राण वाचले असते. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला.