शिवणी येथे डायरियाची लागण

By Admin | Updated: June 24, 2016 23:36 IST2016-06-24T23:36:48+5:302016-06-24T23:36:48+5:30

वृद्ध दगावला; १५ रुग्णांवर उपचार सुरू.

Diarrhea infection at Shiite | शिवणी येथे डायरियाची लागण

शिवणी येथे डायरियाची लागण

मंगरुळपीर (जि. वाशिम): तालुक्यातील शिवणी दलेलपूर येथे डायरियाची लागण झाली असून, यामध्ये जयाजी भगत या ७८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. या घटनेने खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने घटनास्थळ गाठून उपचार सुरू केले. आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची चमू तेथे २४ तास लक्ष ठेवून असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी दिली.
शिवणी दलेलपूर येथे २१ जूनपासून डायरियाची लागण सुरू झाली. यामध्ये २२ जून रोजी जयाजी भगत यांचा मृत्यू झाला. पहिल्या दिवशी तीन, दुसर्‍या दिवशी सहा आणि तिसर्‍या दिवशी सात अशा १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सात वृद्ध व बालकांना वाशिम येथे पुढील उपचारार्थ पाठविण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नव्हाते यांनी दिली. काही रुग्ण आपापल्या सोयीनुसार खासगी तथा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी संभावित रूग्णांसाठी आरोग्य शिबिर सुरू ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या.

Web Title: Diarrhea infection at Shiite