नारायणखेड येथे अतिसाराची लागण

By Admin | Updated: July 15, 2015 00:49 IST2015-07-15T00:49:19+5:302015-07-15T00:49:19+5:30

रुग्णांच्या संख्येत वाढ.

Diarrhea infection in Narayankhed | नारायणखेड येथे अतिसाराची लागण

नारायणखेड येथे अतिसाराची लागण

देऊळगावमही (जि. बुलडाणा) : जवळच असलेल्या नारायणखेड येथे अतिसाराची लागण झाल्यामुळे असंख्य रुग्ण हैराण झाले आहेत. यांची दखल आरोग्य यंत्रणेने घेऊन उपचार सुरु केला आहे. तरीही दोन दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देऊळगावराजा तालुक्यातील नारायणखेड येथे १२ जुलै रोजी अतिसाराची लागण झाल्यामुळे असंख्य रुग्णांना देऊळगावमही येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. यावेळी खाटा कमी पडल्याने अनेक रुग्णांना जमिनीवर उपचार घ्यावा लागला, यामुळे लागणमुळे आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडत असून, अजूनही रुग्णांवर उपचार सुरुच आहेत. दूषित पाणी पिण्यात आल्याने गावातील पाइपलाइनच्या लिकेजमुळे हा प्रकार झाल्याचे गावातील पाइपलाइनच्या लिकेजमुळे हा प्रकार झाल्याचे नागरिक सांगत असून, याला ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. येथील नागरिकांना या आजारातून बाहेर काढावयाचे असल्यास शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे आवश्यक आहे. वेळीच योग्य उपाय योजना न केल्यास एखाद्या रुग्णास आपला जीवही गमवावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबंधित प्रशासनाने योग्य उपाय योजना करून त्वरित कामाला लागून साथ आटोक्यात आणण्याची मागणी येथील रहिवाशी करीत आहे. नारायणखेड येथील अनेक रुग्णांवर खासगी रुग्णालयातही उपचार सुरू आहेत. याकडे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, जि.प.सदस्य विनोद वाघ, अरविंद शिंगणे यांनी १२ जुलै रोजी गावात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. यावेळी व्यापारी आघाडीचे तालुका अध्यक्ष शशीकांत देशमुख, ङ्म्रीकृष्ण शिंगणे, बजरंग दलाचे राजू शिंगणे, नागेश हुसे यांनी नारायणखेड येथे भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. यावेळी सरपंच मुंढे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Web Title: Diarrhea infection in Narayankhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.