ध्येयवेडे लोक यशाचे शिखर गाठत असतात - राजू केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:24 IST2021-07-10T04:24:11+5:302021-07-10T04:24:11+5:30
स्काॅलरशिप मिळवल्याबद्दल राजू केंद्रे याचा सत्कार दुसरबीड येथील नारायणराव नागरे महाविद्यालयामध्ये आपण सारेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता़ ...

ध्येयवेडे लोक यशाचे शिखर गाठत असतात - राजू केंद्रे
स्काॅलरशिप मिळवल्याबद्दल राजू केंद्रे याचा सत्कार दुसरबीड येथील नारायणराव नागरे महाविद्यालयामध्ये आपण सारेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नागरे हाेते. या वेळी लोकजागरचे विश्वस्त प्रवीण गीते यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी प्रवीण गीते, विनोद ठाकरे, विठ्ठल चव्हाण, दीपक कायंदे, विजय डोघोळे, गणेश डोईफोडे, नंदू शिंगणे, विशाल इंगोले, व्ही़ टी. जायभाये यांनी प्रयत्न केले तर कार्यक्रमाला माजी आमदार तोताराम कायंदे, मधुकरराव देशमुख, वामनराव जाधव, प्राचार्य शिवराज कायंदे, क्रीडा मार्गदर्शक गजेंद्र देशमुख, प्रा. वाघ, प्रा. गणेश घुगे, अनिल गायकवाड, गजानन मुंडे, अनिल रणमाळ आदींसह नारायणराव नागरे महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित हाेते. संचालन व आभार विनोद ठाकरे यांनी केल़े