आरक्षणासाठी धनगर समाजाचे धरणे
By Admin | Updated: August 6, 2014 00:28 IST2014-08-05T22:37:12+5:302014-08-06T00:28:21+5:30
धनगर समाजाच्यावतीने उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

आरक्षणासाठी धनगर समाजाचे धरणे
खामगाव : धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा तीव्र निषेध धनगर समाजाच्यावतीने करण्यात येत असून सोमवारी धनगर समाजाच्यावतीने उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती पासून वंचित ठेवल्यामुळे धनगर समाज आर्थिक, शैक्षणिक राजकीय आदी क्षेत्रांमध्ये इतर समाजाच्या तुलनेत मागे राहिला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार धनगर व धनगड हे दोन्ही शब्द समान असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे अनुसुचित जमातीत धनगर समाजाचाही समावेश असल्याने त्याची अंमलबजावणी करा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी उपविभागीय अधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर शरद वसतकार, शांताराम बोधे, भरत वाघ, शिवम बोळे, अशोक हटकर, गुलाब हटकर, संतोष हटकर, गजानन जुमळे, अनंता जुमळे, शांताराम वरखेडे, रविंद्र गुरव, काळदाते, अनंता बोरसे यांच्या स्वाक्षरी आहेत.