खामगाव मतदारसंघात रंगतोय चुरशीचा सामना
By Admin | Updated: October 9, 2014 00:23 IST2014-10-09T00:23:16+5:302014-10-09T00:23:16+5:30
भाजप, काँग्रेस आणि भारिप-बहुजन महासंघामध्येच तिहेरी लढतीचे संकेत.

खामगाव मतदारसंघात रंगतोय चुरशीचा सामना
अनिल गवई / खामगाव
खामगाव विधानसभा निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि भारिप-बहुजन महासंघामध्येच तिहेरी लढतीचे संकेत असून, मतदारसंघावर पुन्हा वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजपनेते भाऊसाहेब फुंडकर जिवाचे रान करीत आहेत. त्याचवेळी पकड कायम ठेवण्यासाठी आ. दिलीपकुमार सानंदा यांची धडपड आहे. फुंडकर-सानंदांच्या दुहेरी लढाईत भारिपच्या अशोक सोनोने यांनीही दमदार उडी घेतली. त्यामुळे लढत रंगतदार होणार असल्याचे या म तदारसंघातील चित्र आहे.
खामगाव विधानसभा मतदार संघात एकूण ११ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे आ. दिलीपकुमार सानंदा, भाजपाचे अँड. आकाश फुंडकर, शिवसेनेचे हरिदास हुरसाड, राष्ट्रवादीचे माजी आमदार नाना कोकरे, भारिप-बहुजन महासंघाचे अशोक सोनोने, यूडीएफ सम िर्थत अपक्ष हाजी बुढन खान, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रताप तेजराव वानखडे, अखिल भारतीय हिंदू महासभेचे संकेत शेळके पाटील, मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीचे मो. हसन अ. खालीक तसेच अ पक्ष शे. इरफान शेख सुभान कुरेशी, श्याम बन्सीलाल शर्मा यांचा समावेश आहे.
सानंदा यांनी तीन वेळा विजय संपादन केला. त्यामुळे या मतदारसंघात त्यांचा एकछत्री अंमल आहे. मात्र, या निवडणुकीत खामगाव मतदारसंघावर पुन्हा ताबा मिळविण्यासाठी आ. भाऊसाहेब फुंडकर यांनी कंबर कसली आहे. या मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये लढ तीचे चित्र असले तरी भारिपच्या अशोक सोनोने यांनी आपली दावेदारी प्रबळ केली आहे. त्यामुळे काँग्रेस, भाजप आणि भारिप अशी तिहेरी लढतीचे चित्र आहे.
याशिवाय राष्ट्रवादीचे नाना कोकरे हेसुद्धा यावेळी नशीब आजमावत असून, यूडीएफ सर्मथित अपक्ष उमेदवार हाजी बुढन खान पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
त्यांच्या उमेदवारीमुळे मुस्लिम समाजाच्या मतांचे विभाजन अटळ असल्याने त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. भाजप, सेना युतीत काडीमोड झाल्याने राज्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये भाजप, सेनेचे उमेदवार परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. अनेक मतदारसंघात या उमेदवारांमध्ये खटकेदेखील उडत आहेत.