भाविक आणि पर्यटकांनी संतनगरी फुलली

By Admin | Updated: October 26, 2014 23:04 IST2014-10-26T23:04:56+5:302014-10-26T23:04:56+5:30

शेगावात पर्यटकांचा उंच्चाक.

The devotees and tourists flourished | भाविक आणि पर्यटकांनी संतनगरी फुलली

भाविक आणि पर्यटकांनी संतनगरी फुलली

शेगाव : महाराष्ट्राचे भक्तीस्थान संत गजानन महाराजांच्या शेगाव संत नगरीत दिवाळीच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी राज्यातून लाखो भाविक येत आहे. गदीर्ने उच्चांक केला असून भाविकांना सेवा सुविधा पुरविण्यासाठी गजानन महाराज संस्थान नेहमीसारखेच नव्या जोमाने तत्पर दिसून येत आहे. दिवाळीच्या सुट्टीत दररोज किमान एक लाख भाविक व पर्यटक येत असल्याने शेगावात भक्तांचा पूर आल्याचे चित्र आहे. दिवाळीच्या सुट्ट्या आणि जोडून आलेला शनिवार रविवार यामुळे दिवाळीच्या आनंदाचा गोडवा वाढविण्यासाठी भाविक भक्तांनी शेगावला पहिली पसंती दिली आहे. सहकुटूंब सह परिवार भाविक व पर्यटक शेगांवला येत आहे. नगर परिषदेपासून तर मंदिरापयर्ंत हजारो वाहनांची येथे गर्दी झाली आहे. दिवसभर पर्यटनाची मजा लुटल्यानंतर सायंकाळी बाजार पेठेत जाम, जेली, चिक्की शॉप, खेळणी, कपडे, स्ट्रॉबेरी, मिठाई, मध, चणे आदी वस्तू खरेदीसाठी गर्दी होत आहे. पर्यटकांच्या वाढत्या गाड्यांच्या संख्येने शहरात वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. वाढत्या गर्दीमुळे वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पोलिस यंत्रणाही तत्पर राहून ही कोंडी काढण्यासाठी विविध उपाय शोधत आहेत. रात्रीच्या वेळेस भर रस्त्यावर आपली वाहने उभी करून गेलेल्या बेशिस्त वाहन चालकांमुळे आज दिवस भर मंदिर परिसरात वाहतुकीची कोंडी दिसून आली. वाहतूक विभागाने केलेल्या महत्त प्रयत्नानंतर ही कोंडी सुटली.

Web Title: The devotees and tourists flourished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.