सर्मपित भावनेचा सन्मान झालाच पाहिजे

By Admin | Updated: June 28, 2015 23:09 IST2015-06-28T23:09:13+5:302015-06-28T23:09:13+5:30

‘मिसा बंदीं’चा स्नेहमेळाव्यात संचेती यांचे प्रतिपादन.

The devoted feeling must be respected | सर्मपित भावनेचा सन्मान झालाच पाहिजे

सर्मपित भावनेचा सन्मान झालाच पाहिजे

बुलडाणा : संघर्ष हा मानवी मनाचा स्थायिभाव असल्याने अन्यायाविरोधात पेटून उठण्याची ऊर्जा ज्या विचारांतून प्रकट होते, त्या सत्कार्याच्या ऋणातून मुक्त होण्याचे भाग्य लाभण्याचा क्षण इतिहासात अजरामर राहणार आहे. घरावर तुळशीपत्र ठेवून, कुटुंबीयांना हालअपेष्टा सहन करण्यासाठी मागे ठेवून देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याच्या सर्मपित भावनेचा सन्मान करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांच्या समकक्ष दर्जा मिळालाच पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आ. चैनसुख संचेती यांनी केली.
गर्दे वाचनालय सभागृहात आणीबाणीला ४0 वर्षे पूर्ण झाल्याने त्यावेळी तुरुंगवास पत्करणार्‍या  'मिसा बंदीं'चा मेळावा व सत्कार समारंभ २६ जून रोजी दुपारी पार पडला. यावेळी जयप्रकाश नारायण यांचे प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर 'मिसा बंदीं'चा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर अ.भा. लोकतंत्र सेनानी संघाचे जिल्हाध्यक्ष रामदास कारोडे, आ.डॉ. संजय कुटे अण्णासाहेब बाजड, रामदास बिडकर, डॉ. प्रकाश गुळवे उपस्थित होते.

Web Title: The devoted feeling must be respected