बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा विकास साधणार : ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:16 IST2021-01-24T04:16:40+5:302021-01-24T04:16:40+5:30

यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र अध्यक्ष शोभाताई जाधव होत्या, तर प्रमुख अतिथी राज्यमंत्री दर्जा प्राप्त ज्योतीताई ठाकरे, विभागीय ...

Development of women through self help groups: Thackeray | बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा विकास साधणार : ठाकरे

बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा विकास साधणार : ठाकरे

यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र अध्यक्ष शोभाताई जाधव होत्या, तर प्रमुख अतिथी राज्यमंत्री दर्जा प्राप्त ज्योतीताई ठाकरे, विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार, माविम बुलडाणा जिल्हा समन्वय अधिकारी सुमेध तायडे, सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी कुंदन सदानशिव, लेखाधिकारी जहागिरदार, उपजीविका विकास मार्गदर्शक विशाल पवार, महेश राजपूत, केंद्र पदाधिकारी प्रयाग नागरे, शोभा जायभाये, ज्योती खंड, सुमनताई भोसले यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून मान्यवारांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. राज्य अध्यक्ष ज्योतीताई ठाकरे यांना अस्मिता केंद्राच्या वतीने जागतिक खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर प्रतिमा भेट देण्यात आली.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना लोणार तालुक्यातील कार्यक्षेत्रात असलेल्या संपूर्ण गावातील महिला बचत गटांच्या महिलांच्या सर्वांगीण विकासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती दिली. केंद्र व्यवस्थापन व केंद्र कार्यप्रणाली, केंद्र सक्षम व स्वबळावर कसे उभे राहून स्वायत्त होईल, याबाबत मार्गदर्शन केले. केशव पवार व सुमेध तायडे यांनी सुद्धा याप्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी महिलांनी आपल्या समस्या मांडल्या. कार्यक्रमांचे प्रास्ताविक केंद्र व्यवस्थापक गजेंद्र गवई यांनी केले. सूत्रसंचालन सहयोगिनी प्रमिला पवार यांनी केले, तर आभार मोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र व्यवस्थापक गजेंद्र गवई, लेखापाल आवेश शेख, प्रकल्प समन्वयक मोरे, सहयोगिनी वंदना मोरे, सुनीता कलम्बे, मंजुला वाठोरे, उषा वाघ, प्रमिला काकडे, ज्योती मोरे व केंद्र कार्यकारिणी गाव विकास समिती पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Web Title: Development of women through self help groups: Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.