तीन अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीमुळे विकास हाेणार - गणेश सवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:41 IST2021-09-14T04:41:09+5:302021-09-14T04:41:09+5:30

एका छोट्याशा कार्यक्रमात अकोला येथील अधीक्षक अभियंता जी. बी. जोशी यांची मुख्य अभियंता अमरावती आणि उपविभागीय अधीक्षक देऊळगाव राजा ...

Development will happen due to promotion of three officers - Ganesh Sawade | तीन अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीमुळे विकास हाेणार - गणेश सवडे

तीन अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीमुळे विकास हाेणार - गणेश सवडे

एका छोट्याशा कार्यक्रमात अकोला येथील अधीक्षक अभियंता जी. बी. जोशी यांची मुख्य अभियंता अमरावती आणि उपविभागीय अधीक्षक देऊळगाव राजा आर. टी. काळवाघे यांची पदोन्नती झाल्याने सत्कार करण्यात आले. पुढे बोलताना ते म्हणाले की, या तिन्ही अधिकाऱ्यांना सिंदखेड राजा मतदारसंघातील संपूर्ण माहिती असल्यामुळे येणाऱ्या काळात विकासकामात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. तसेच या तिन्ही अधिकाऱ्यांनी या गोदरी मातृतीर्थ मतदारसंघात अनेक विकासकामे केलेली आहे. आणि येणाऱ्या काळात अनेक विकासकामे करणार आहे, अशी ग्वाही दिली. या वेळी वरिष्ठ लिपिक भूषण खेडेकर, सतीश शास्त्री, वरुण चौधरी, प्रभू गारोळे, शाखा अभियंता एम. एस. शेळके, डी. यू. भाले, एस. एच. जांभोरकर आदी उपस्थित होते. (वा़ प्र. )

Web Title: Development will happen due to promotion of three officers - Ganesh Sawade