३३0 गावांसाठी विकास योजनांचा आराखडा तयार
By Admin | Updated: February 28, 2015 01:12 IST2015-02-28T01:12:17+5:302015-02-28T01:12:17+5:30
५३८ कोटींचे नियोजन; गावनिहाय आराखड्यांवर दिला भर.

३३0 गावांसाठी विकास योजनांचा आराखडा तयार
बुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रथम टप्प्याचा प्राथमिक स्वरूपाचा आराखडा २६ फेब्रुवारी रोजी तयार करण्यात आला आहे. यात ५३८ कोटींचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. या आराखड्यानुसार ३३0 गावांमध्ये जलसंधारणाची कामे होणार आहेत. यातून जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होईल.
ह्यसर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र २0१९ह्ण अंतर्गत जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. या त ३३0 गावांमध्ये नऊ विभागांच्या माध्यमातून जलसंधारणाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत.
अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी निवड करण्यात आलेल्या गावांचा विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. यात कृषी, वन, सामाजिक वनीकरण, लघुसिंचन व जलसंधारण, जिल्हा परिषदेचा लघुसिंचन विभाग, जलसंपदा, भूजल सर्वेक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा योजना व ग्रामपंचायती आदींचा समावेश आहे. या विभागामार्फत निवड करण्यात आलेल्या गावात कोणत्या योजना राबविल्या जाणार आहेत, याची माहिती नोडल अधिकार्यांना द्यावयाची असून, त्यानंतर विकास आराखडा तयार करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
जलयुक्त शिवारामध्ये निवडलेल्या गावांचा अभ्यास करून गावनिहाय आराखडा तयार केला आहे. यामध्ये होणार्या कामांवर जिल्हास्तरीय समितींचे लक्ष राहणार असून, या कामांमधून सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणाचाही उद्देश सफल होईल व भविष्यातील पाणी टंचाईवर मात करता येईल, अशी आशा जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी व्यक्त केली.
*जिल्हास्तरीय समिती गठित
टंचाईग्रस्त गावांमध्ये कायमस्वरूपी उपाययोजना होणे अपेक्षित आहे. यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. यात जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्ह्यातील आमदार व खासदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा पातळीवरील अधिकार्यांचा समावेश आहे.