देऊळगाव कुंडपाळ सरपंचपदी सरकटे
By Admin | Updated: October 17, 2014 23:49 IST2014-10-17T23:49:23+5:302014-10-17T23:49:23+5:30
अविरोध निवड.

देऊळगाव कुंडपाळ सरपंचपदी सरकटे
लोणार (बुलडाणा) : तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ ग्रामपंचायतच्या सरपंचपदी कुसूम कैलास सरकटे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. देऊळगाव कुंडपाळ ग्रामपंचाय तच्या सरपंच पदाचा ४ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर केशव बळीराम सरकटे यांनी आ पल्या सरपंच पदाचा राजीनामा लोणार पं.स.सभापतींकडे सादर केला. त्यामुळे देऊळगाव कुंडपाळ येथील सरपंच पद रिक्त झाले असता ९ ऑक्टोबर रोजी सरपंचपदाची निवडणूक देऊळगाव कुंडपाळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. यामध्ये सरपंच पदाकरीता कुसूम कैलास सरकटे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे सरपंचपदी कुसूम सरकटे यांची अविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी चोले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तलाठी केंद्रे, ग्रामसेवक म्हस्के यांनी काम पाहिले. निवडणूक अविरोध होण्यासाठी माजी सरपंच बबनराव सरकटे, सुधाकर नरवाडे यांनी परिश्रम घेतले.