दलित हत्याकांडातील संशयीत ताब्यात
By Admin | Updated: October 29, 2014 00:27 IST2014-10-29T00:27:19+5:302014-10-29T00:27:19+5:30
वाशिम पोलिसांची कारवाई

दलित हत्याकांडातील संशयीत ताब्यात
वाशिम: अहमदनगर जिल्ह्यातील दलित हत्याकांडातील संशयीत आरोपीला वाशिम पोलिसांनी जिल्ह्यातील सोनखास येथून मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले.
पाथर्डी तालुक्यातील जवखेड येथील दलित हत्याकांडांच्या तपासाची सुई वाशिम जिल्ह्यातील सोनखास येथे वळली आहे. जवखेड हत्याकांडातील एक संशयित आरोपी आकाश गोरे (२१) वाशिम जिल्ह्यातील सोनखास येथील रहीवाशी असून तो अहमनगर जिल्ह्यातील रांजणगाव येथे एका खासगी कंत्राटदाराच्या हाताखाली कामास होता. दिवाळी निमीत्त संशयित आरोपी सोनखास येथे आला होता.
वाशिम पोलिसांनी संशयित आकाशला ताब्यात घेऊन अधिक तपासासाठी त्याची रवानगी अहमदनगरला केली आहे.