वादळाच्या तडाख्यात पाच घरे उद्ध्वस्त
By Admin | Updated: October 18, 2014 00:06 IST2014-10-18T00:06:01+5:302014-10-18T00:06:01+5:30
दोन जण जखमी : मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी येथील घटना.

वादळाच्या तडाख्यात पाच घरे उद्ध्वस्त
पिंप्री गवळी (मातोळा, जि. बुलडाणा) : वादळी वारा व अवचित आलेल्या परतीच्या पावसाने आज शुक्रवारी सायंकाळी मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळीसह परिसरातील गावांना झोडपून काढले. या वादळामुळे पिंप्री गवळी गावातील पाच घरे पडून दोन जण जखमी झाले. तालुक्यातील दाभाडी, चार्वदा या मार्गावरील झाडे उन्मळून पडली. शुक्रवारी सकाळीपासून सर्वत्र ढगाळ वातावरण होते. त्यामुळे बर्याच ठिकाणी दुपारी तुरळत स्वरूपाचा पाऊस झाला. सायंकाळी ५.३0 च्या सुमारास पिंप्री गवळी परिसरात सोसाट्याच्या वादळ वार्यासह मुसळधार पाऊस कोसळला. तब्बल दीड तास सुरू असलेल्या या वादळी पावसामुळे गावातील पाच घरांची पडझड झाली. टिनपत्रे अंगावर पडल्यामुळे इंदुबाई जगदेव डाबेराव आणि पुरुषोत्तम डाबेराव हे दोघे गंभीर जखमी झाले. वादळामुळे गावासह चार्वदा मार्गावरील विजेचे खांब तुटून पडल्यामुळे गावा तील वीजपुरवठा खंडित झाला होता.