‘गडकरी वाड्या’वर इच्छुकांची वारी
By Admin | Updated: August 26, 2014 22:23 IST2014-08-26T22:23:05+5:302014-08-26T22:23:05+5:30
उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग

‘गडकरी वाड्या’वर इच्छुकांची वारी
बुलडाणा : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांसह इच्छुकांनी सलग दोन दिवस नागपूरमध्ये गडकरी वाड्यावर हजेरी लावल्याची माहिती आहे. उमेदवारीसाठी ह्यफिल्डिंगह्ण लावण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार्यांमध्ये दुसर्या पक्षातील इच्छुकांचाही समावेश असल्याची माहिती आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आले आहेत. यापैकी चिखली या मतदारसंघात सध्या तिकिटासाठी रस्सीखेच सुरू आहे. जळगाव जामोद आणि मलकापूर या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. चिखली मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला होता. यावेळी मात्र येथूनच इच्छुक उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ खामगावचा क्रम आहे. आमदार भाऊसाहेब फुंडकर किंवा त्यांचे चिरंजीव अँड. आकाश फुंडकर यांच्या उमेदवारीची चर्चा असतानाच आता खामगावातही स्पर्धक उभे ठाकले आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विविध कार्यक्रमांसाठी नागपूरमध्ये असल्याची संधी साधून बुलडाणा जिल्ह्यातील अनेक इच्छुकांनी त्यांच्या वाड्यावर हजेरी लावली. इच्छुकांनी या दोन दिवसांमध्ये गडकरींची भेट घेऊन त्यांची उमेदवारी कशी सक्षम राहील, हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला.