वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST2021-09-26T04:37:12+5:302021-09-26T04:37:12+5:30

ज्येष्ठ नेते महेंद्र पनाड यांच्या नेतृत्वात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांनी, काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने ...

The deprived Bahujan Aghadi should come to power | वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन मेळावा

वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन मेळावा

ज्येष्ठ नेते महेंद्र पनाड यांच्या नेतृत्वात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांनी, काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने हिंदुत्वाची भीती दाखवून मुस्लीम समुदायाला सत्तेपासून वंचित ठेवले, तर शिवसेना-भाजप यांनी हिंदुत्वाचा मायाजाल दाखवून बहुजनांना सत्तेपासून वंचित ठेवले. त्यामुळे सर्व बहुजन समाज सामाजिक, आर्थिक तसेच, राजकीय हक्कापासून वंचित राहिला असा आरोप केला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी सक्षम उमेदवार देणार आहे. संपूर्ण ताकदनिशी वंचित बहुजन आघाडी निवडणुकीमध्ये उतरणार आहे, असे प्रतिपादन नीलेश जाधव यांनी यावेळी केले. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, प्रत्येक गावात वंचितची शाखा करून बूथबांधणी, सभासद नोंदणी करावी, असे आवाहन केले. प्रास्ताविक दिलीप राठोड यांनी केले. याप्रसंगी प्रशांत वाघोदे, बाला राऊत, भीमराव शिरसाट, बाबाराव वाघ, शेख मोबीनभाई, विद्याधर गवई, मालतीताई कळंबे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन बळी मोरे यांनी केले. यावेळी सुनील इंगळे, मिलिंद मोरे, पवन अवसरमोल, श्याम कटारे, शिवप्रसाद वाठोरे, सुनील देहाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: The deprived Bahujan Aghadi should come to power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.