डेंग्यूसदृश रूग्ण आढळला
By Admin | Updated: December 15, 2014 23:43 IST2014-12-15T23:43:42+5:302014-12-15T23:43:42+5:30
मोताळा तालुक्यातील पिंप्रीगवळी येथे डेग्यू सदृश रूग्ण.
_ns.jpg)
डेंग्यूसदृश रूग्ण आढळला
पिंप्रीगवळी (बुलडाणा): गावात डेंग्यूसदृश तापाचा रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोताळा तालुक्यातील पिंप्रीगवळी येथे निखिल सुरेश माळूकर (१३) यास ताप येत असल्यामुळे मलकापूर येथे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास डेंग्यू ताप आल्याचे सांगितले. त्याची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. गावाच्या परिसरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे विविध आजारात वाढ होत आहे. याची संबंधितांनी दखल घेऊन स्वच्छता अभियान राबविण्याची गरज आहे.