वडगाव तेजन येथे डेंग्यूचा रुग्ण आढळला

By Admin | Updated: November 7, 2014 23:23 IST2014-11-07T23:23:46+5:302014-11-07T23:23:46+5:30

सुलतानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावातील प्रकार, ११ वर्षीय मुलगी बाधित.

Dengue patient was found at Wadgaon Tejan | वडगाव तेजन येथे डेंग्यूचा रुग्ण आढळला

वडगाव तेजन येथे डेंग्यूचा रुग्ण आढळला

वडगाव तेजन ( बुलडाणा) : सुलतानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या ११ वर्षाच्या मुलीला डेंग्यूसदृश ताप असल्याचे आढळून आले आहे. वडगाव तेजन येथे डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले आहे. येथील अश्‍विनी संजाब लोढे (११) हिला ताप आल्यामुळे उपचारार्थ औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले; दरम्यान तिला डेंग्यूसदृश ताप असल्याचे निष्पन्न झाले आहे. परिसरात सुरु असलेल्या या डेंग्यूसदृश ता पामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतने गावात धूरफवारणी करुनही डासांचा उपद्रव वाढतच आहे. त्यामुळे परिसरात अज्ञात तापाचे रुग्णही घराघरात मिळून येत आहेत. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देऊन रुग्णांची तपासणी करण्या त यावी व औषधोपचार करण्यात यावा; तसेच गावात स्वच्छता मोहीम राबवून डास निर्मूलन करण्याची मागणीही ग्रामस्थांमधून होत आहे.

Web Title: Dengue patient was found at Wadgaon Tejan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.