डेंग्यूचा रूग्ण आढळला
By Admin | Updated: October 1, 2014 00:39 IST2014-10-01T00:39:40+5:302014-10-01T00:39:40+5:30
आसलगाव: ग्रामपंचायतचे साफसफाईकडे दुर्लक्ष.

डेंग्यूचा रूग्ण आढळला
आसलगाव (बुलडाणा) : येथील वार्ड क्र.१ मध्ये राहणार्या प्रियंका दत्तु दांडगे (वय १४) या मुलीला डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे गावात घाणीचे साम्राज्य असून, साफसफाईबाबत ग्रा.पं.कडे तक्रार सुद्धा करण्यात आली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. यामुळे ग्रामस्थांकडून रोष व्यक्त केल्या जात आहे. येथील प्रियंका दत्तू दांडगे या १४ वर्षाच्या बालिकेला ४-५ दिवसांपूर्वी जळगाव जामोद येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिला डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तापाची साथ एडिस इजिप्टायटिस या डासाच्या चाव्यामुळे पसरते. दांडगे यांच्या घराजवळ गेल्या कित्येक दिवसांपासून ग्रामपंचायतकडून सांडपाण्याची विल्हेवाट न लावल्यामुळे घाण पाण्याचे डबके साचलेले आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी अनेकवेळा ग्रामपंचायतला निवेदने दिलेली असून, उपोषणाचे इशारेसुद्धा दिले. तरी सुद्धा कुंभकर्णी झोपेत असलेल्या ग्रामपंचायतने दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामपंचायतने गावात साफसफाई मोहीम राबवावी, अशी मागणी गावकर्यांकडून होत आहे.