डेंग्यू सदृश तापेने चिमुकल्याचा मृत्यू
By Admin | Updated: September 22, 2014 00:35 IST2014-09-22T00:35:48+5:302014-09-22T00:35:48+5:30
सिंदखेडराजा येथील दहा वर्षीय चिमुकल्याचा डेंग्यू सदृश तापेने मृत्यू

डेंग्यू सदृश तापेने चिमुकल्याचा मृत्यू
सिंदखेडराजा (बुलडाणा): डेंग्यू सदृश तापेने येथील एका दहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला असून, डेंग्यू सदृश्य तापेने शहरासह तालुक्यात थैमान घातले आहे. येथील दहा वर्षीय अमित अतुल मेहेत्रे यास डेंग्यूसदृश ताप असल्याने जालना येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु ताप वाढतच असल्याने त्याला औरंगाबाद येथे उपचारासाठी नेत असतांनाच त्याचा मृत्यू झाला. सिंदखेडराजा व परिसरातील गावामध्ये डेंग्यू सदृश्य तापेचे रुग्ण वाढले असून, ग्रामीण रुग्णालयामध्ये दररोज सुमारे ३00 च्या आसपास रुग्ण उपचारासाठी येत आहेत. तर शहरामध्ये खासगी दवाखान्यातही डेंग्यू सदृश्य तापेच्या रुग्णांचीच गर्दी आहे.