शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
3
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
4
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
5
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
6
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
7
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
8
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
9
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
10
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
11
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
12
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
13
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
14
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
15
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
16
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
17
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
18
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
19
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
20
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला

अकोल्यातील शेतकरी आंदोलन दडपण्याच्या निषेधार्थ निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 1:10 AM

सोयाबीन कापूस व धानाला हमी भाव मिळावा, शेतकर्‍यांना त्वरित संपूर्ण कर्जमाफी  मिळावी या व इतर मागण्यांसाठी अकोला येथे लोकजागर मंचाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला  होता. या मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बुलडाणा  येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध व्यक्त करीत निदर्शने केली.

ठळक मुद्देयशवंत सिन्हा व रविकांत तुपकर यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याचा निषेधचिखलीत सरकारच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सोयाबीन कापूस व धानाला हमी भाव मिळावा, शेतकर्‍यांना त्वरित संपूर्ण कर्जमाफी  मिळावी या व इतर मागण्यांसाठी अकोला येथे लोकजागर मंचाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला  होता. या मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बुलडाणा  येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध व्यक्त करीत निदर्शने केली.सोयाबीन, कापूस व धानाला हमीभाव द्यावा, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या व इतर  मागण्यांसाठी अकोला येथील शेतकरी जागर मंचाने ४ डिसेंबर २0१७ रोजी गांधी जवाहर बागेतून  मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व  स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी केले. मोर्चानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी  जात असताना अकोला पोलिसांनी यशवंत सिन्हा व रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते  व शेतकर्‍यांना स्थानबद्ध केले. दरम्यान, मागण्या मान्य होईपर्यंत येथून हलणार नाही, अशी  आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांविरुद्ध धाकद पटशाही केली. पोलिसांच्या या कृतीचे तीव्र पडसाद उमटले असून, मंगवारी बुलडाणा जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन यांच्या नेतृत्वात  शासनाचा निषेध करून तीव्र निदर्शने केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी  शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत झालेल्या प्रकाराचा निषेध केला. तसेच स्थानबद्ध करण्या त आलेल्या यशवंत सिन्हा, रविकांत तुपकर व शेतकर्‍यांची बिनशर्त सुटका करून शेतकर्‍यांच्या  मागण्या विनाविलंब मंजूर कराव्यात, अशी मागणी केली.शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य न केल्यास व यशवंत सिन्हा, रविकांत तुपकर व त्यांच्या सहकार्‍यांची  तातडीने सुटका न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून जिल्हाभर तीव्र  आंदोलन करेल, असा इशारा राणा चंद्रशेखर चंदन यांनी दिला. या आंदोलनामध्ये त्यांच्यासह श्याम अवथळे, शे. रफिक, शे. करीम, प्रदीप शेळके, महेंद्र  जाधव, पवन देशमुख, शे. वसीम, गंगाधर तायडे, अनिल पडोळ, अविनाश डुकरे, कडूबा मोरे,  अमिन खासाब, हरिभाऊ उबरहंडे, गजानन गवळी, रशीद पटेल, डॉ. भानुदास जगताप, शे.  साजिद, राजू पन्हाळकर, मुकुंदा शिंबरे, डिगंबर हुडेकर, दत्तात्रय राऊत, गुलाबराव काळवाघे,  मुश्कीन शाह, समाधान धंदर, शत्रुघ्न तुपकर, गोपाल जोशी, रमेश जाधव, रामेश्‍वर जाधव,  नारायण चंदेल, रामदास खसावत, विनोद कांबळे, गजानन पवार, धनंजय मुरकुटे, राहुल गाडे,  पंकज शेजोळे, शे. अजीज, संदीप तांगडे, गोटू जेऊघाले, रामेश्‍वर जाधव, गजानन जाधव,  पुरुषोत्तम तांगडे, सतीश नवले, पद्माकर गवई, मयूर सोनुने, जाबीर खान, नीलेश पुरभे, बाबुराव  सोनुने, अमोल मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.दरम्यान, स्थानबद्ध करण्यात आलेल्यांची त्वरेने सुटका न केल्यास तथा मागण्या मान्य न केल्यास  स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन