बुलडाण्यात शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 14:47 IST2020-02-18T14:47:26+5:302020-02-18T14:47:54+5:30
१९ फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

बुलडाण्यात शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील विविध शस्त्रांचा संग्रह व अभ्यास करणारे कोल्हापुर येथील गिरीश लक्ष्मण जाधव यांच्या शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन बुलडाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने येथील जिजामाता प्रेक्षागारात करण्यात आले आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले.
१९ फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यत सर्वांसाठी खुले राहणार आहे. शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्धघाटन आ. रोहित पवार व लखुजी राजे जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आ. संजय गायकवाड, उत्सव समितीचे अध्यक्ष अॅड. जयसिंग देशमुख, सचिव सुनिल सपकाळ, कार्याध्यक्ष डॉ. शोन चिंचोले यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते. यंदा बुलडाण्यातील शिवजयती एक ऐतिहासीक असा कार्यक्रम ठरणार असून शिवकालीन शस्त्र आणि शिवाजी महाराजांचे विचार सांगणाऱ्या ग्रंथाचे प्रदर्शन या निमित्त लक्षवेधी आहे. दरम्यान, या कार्यक्रमास बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यातून जवळास २० हजार विद्यार्थी भेट देणार असल्याची माहिती शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अॅड. जयसिंगराजे देशमुख यांनी दिली. जिजामाता प्रेक्षागारावर शिवनेरीवली शिवजन्मस्थळ, प्रतापगडावरील माची आणि रायगडाची प्रतिकृती उभारण्यात येत आहे.