अपंग कर्मचारी अधिका-यांचे धरणे आंदोलन

By Admin | Updated: July 24, 2015 00:44 IST2015-07-24T00:44:19+5:302015-07-24T00:44:19+5:30

प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अपंग अधिकारी व कर्मचारी संघटनेचा आंदोलनाचा पवित्रा.

Demolition movement of disabled employees | अपंग कर्मचारी अधिका-यांचे धरणे आंदोलन

अपंग कर्मचारी अधिका-यांचे धरणे आंदोलन

बुलडाणा : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अपंग अधिकारी व कर्मचारी संघटना यांनी गुरूवार २३ जुलै रोजी स्थानिक जिल्हा परिषदेपुढे धरणेआंदोलन केले. यावेळी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद प्रशासनाकडे मागण्याचे निवेदन देण्यात आले. शिक्षण विभाग प्राथमिक मधील ७५ पेक्षा जास्त अंपग कर्मचारी आहे. यांचे दोन वर्षापासून प्रलंबित वाहनभत्ता प्रस्तावाला तात्काळ मंजूरी देण्यात यावी, विस्तार अधिकारी शिक्षण श्रेणी ३ मधील अपंग कर्मचारी यांची पदोन्नती करण्यात यावी, सामान्य प्रशासन विभागातील अपंग कर्मचारी यांची पदोन्नती करण्यात यावी, शासन निर्णयानुसार अपंग कर्मचारी यांना ५0 हजार रुपये वाहन खरेदीसाठी सानुग्रह अनुदान देण्यात यावे, शासन निर्णयानुसार अपंग कर्मचार्‍यांना निवडणूक कामातून वगळण्यात यावे, आदी मागण्या निवेदनातून मांडण्यात आल्या.

Web Title: Demolition movement of disabled employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.