लोककलावंत मानधनापासून वंचित!

By Admin | Updated: October 21, 2014 23:50 IST2014-10-21T23:49:07+5:302014-10-21T23:50:02+5:30

चार महिन्यांचे मानधन रखडले.

Democracy is deprived of honor! | लोककलावंत मानधनापासून वंचित!

लोककलावंत मानधनापासून वंचित!

बुलडाणा : कलावंतांना उतारवयात उदरनिर्वाह करता यावा, याउद्देशाने सरकारकडून दरमहा मानधन दिले जाते. ते मुळातच तुटपुंजे असूनही यावर्षी जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांचे मानधन देण्यात आले नसल्याची माहिती हाती आली आहे. ऐन दिवाळी उत्सवात वृद्ध लोककला कलावंतांची झोळी रिकामीच राहण्याची चिन्हे आहेत. या योजनेंतर्गत ह्यअ श्रेणीतील (राज्यस्तरीय) कलाकारांना दरमहा २१00 रुपये, ह्यब श्रेणीतील (जिल्हास्तरीय) कलावंतांना दरमहा १७00 रुपये आणि ह्यक श्रेणीत (इतर) येणार्‍या कलावंतांना दरमहा १५00 रुपये मानधन देण्यात येते. राज्यात शासकीय मानधन घेणार्‍या वृद्ध कलाकारांची संख्या १९ हजार ४८३ इतकी आहे; मात्र गत चार महिन्यांपासून मानधन रखडल्यामुळे या कलावंतांची परवड होत असून, शासनाने तात्काळ थकित मानधन द्यावे, अशी मागणी कलांवतांनी केली आहे. बहुतांश कलाकारांच्या जगण्याचे साधन मानधनच बनले आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला ते मानधनाची वाट पाहत असतात; मात्र हे मानधन बहुतेकदा वेळेवर मिळत नाही. त्यामुळे वृद्ध कलावंतांना आर्थिक अडचणींना समोरे जावे लागत असल्याचे जिल्हा वृद्ध कलावंत मानधन समितीचे अध्यक्ष वासुदेव देशपांडे यांनी सांगीतले. *प्रशासकीय हलगर्जी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक पाच महिन्यांनी लोककलावंतास उपयोगिता प्रमाणपत्राची गरज असते. यासाठी सर्व प्रमाणपत्रांसह, आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून पंचायत समितीत सादर करावयाची असतात. त्या सर्व अर्जांची तपासणी करुन मानधन देण्याचा प्रस्ताव तालुक्यातील गटविकास अधिकार्‍याकडे पाठविला जातो. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर कलावंताला मानधन दिले जाते; मात्र या सर्व कामासाठी पंचायत समिती स्तरावर हलगर्जी होत असल्याचा आरोप बुलडाणा जिल्हा वृद्ध कलावंत मानधन समितीकडून केला जात आहे.

Web Title: Democracy is deprived of honor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.