रस्त्यासाठी उभारली लोकवर्गणी
By Admin | Updated: September 4, 2015 00:32 IST2015-09-04T00:32:38+5:302015-09-04T00:32:38+5:30
मलकापूर येथील नागरिकांची अभिनव गांधीगिरी

रस्त्यासाठी उभारली लोकवर्गणी
मलकापूर (जि. बुलडाणा) : वारंवार निवेदने, तक्रारी देळनही रस्त्याचे काम होत नसल्याने अखेर लालफीतशाहीला कंटाळून येथील हरीकिरण सोसायटी या मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायतीत मोडणार्या नागरिकांनी जनता महाविद्यालय ते बन्सीलाल नगर रस्त्याच्या कामासाठी तंबू ठोकून लोकवर्गणी गोळा करणे सुरु केले आहे. हरीकिरण सोसायटी या भागातील रस्त्यांची गेली अनेक वर्षे दयनीय अवस्था आहे. अशा परिस्थितीत किमान जनता कॉलेज ते बन्सीलाल नगर या मुख्य रस्त्याचे काम लोकप्रतिनिधींनी करावे अशी या भागातील नागरीकांची अपेक्षा आहे. त्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा केल्यावरही समस्या कायमच आहे. परिणामी रस्त्यावरील खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. अखेर या भागातील रस्ता लोकवर्गणीतून बांधण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला. त्यासाठी जाहीर आवाहनाचा तंबु ठोकुन निधी गोळा केला जात आहे. या अभियानात केदार एकडे, शिवशंकर वराडे, लहु झोपे, त्र्यंबक गावंडे, कृष्णा डिवरे, शेखर नगरे, गजानन पाचपांडे, पराग होले, अतुल वनारे, गोलु नवले, नाना शिंदे, उमेश राऊत, अमृत बोंबटकार, मुकेश पाटील, नितीन गावंडे, प्रशांत तळोले, अवि देशमुख, गजानन कोल्हे, बाळकृष्ण चोपडे, कृणाल नारखेडे, मंदार एकडे, सचिन नालट यांचेसह हरिकिरण सोसायटी परिसरातील नागरीक सहभागी आहेत.